शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

जिल्ह्यात डेंग्यूचे संशयित पाचशेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:58 IST

जळगाव : अवकाळी पाऊस, डासांचा वाढता प्रादूर्भाव यामुळे जिल्ह्यात यंदा डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहचली आहे़ मात्र, गेल्या ...

जळगाव : अवकाळी पाऊस, डासांचा वाढता प्रादूर्भाव यामुळे जिल्ह्यात यंदा डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहचली आहे़ मात्र, गेल्या आठ दिवसांपासून संशयित रूग्णांमध्ये घट होत असून हिवताप कार्यालयाकडे नियमित वीसच्यावर संशयित रूग्णांचे रक्त नमुने येत होते, ते घटून तीन ते चारवर आल्याचे हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे़जिल्हाभरात यंदा डेंग्यूने थैमान घातले होते़ जिल्हाभरात ११५ रूग्णांना डेंग्य ू असल्याचे निष्पन्नही झाले होते़ दोघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे आरोग्य विभागानेही स्पष्ट केले होते़ जिल्हा परिषदेच्या समन्वय बैठकीतही हा मुद्दा गाजला होता़ शेतांमधील बांधावर साचणाऱ्या पाण्यात डेंग्यूचे डास आढळत असल्याने यावर काय उपायायोजना करता येतील, असा प्रश्नही पुढे आला होता़ शिवाय जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचेही समोर आले होते़डेंग्यू निष्पन्न होण्यासाठी होतोय विलंबजिल्हाभरातील डेंग्यूच्या संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमूने धुळे, औरंगाबाद येथे पाठविल्यानंतर त्यांचा रिपोर्ट यायला नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवसांचा अधिक कालावधी लागत असल्याने या रूग्णांना नेमका डेंग्यू आहे किंवा नाही, हे स्पष्ट होण्यास वेळ लागत आहे़ मात्र, रूग्ण संशयित असला तरी हिवताप कार्यालयातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे सांगण्यात आले आहे़जिल्हाभरातील संशयित रूग्णांचे नमूने धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पाठविण्यात येत असतात़ आधी या नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता़ मात्र, आता गेल्या महिना दोन महिन्यांपासून रक्ताचे रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी लागत आहे़ यामुळे नेमक्या किती जणांना डेंग्यूची लागण आहे़ याची स्पष्टता होत नसल्याने रूग्णावर उपचार करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे़ संशयितांच्या रक्तांचे रिपोर्ट लवकर मिळत नसल्याने कदाचित अनेकांचा डेंग्यू शासकीय स्तरावर निष्पन्न झालेला नाही, असेही चित्र आहे़-जिल्हाभरात ४८९ संशयित रूग्ण आहेत-डेंग्यू निष्पन्न झालेल्या रूग्णांचा आकडा ११५ कायम आहे़-यात शहरात ४५ तर जिल्ह्यात ६० रूग्णांना डेंग्यू निष्पन्न झालेला आहे़-आॅक्टोबरपर्यंत २९१ संशयित होते़ ते दीड महिन्यात झपाट्याने वाढले-नियमित २० संशयितरूग्णांचे रक्त नमूने हिवताप कार्यालयाकडे येत होते़-आठ दिवसांपासून ३ ते ४ रूग्णांचे रक्त नमूने तपासणीला येत आहेत़

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव