शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
2
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
3
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
4
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
5
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
6
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
8
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
9
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
11
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
12
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
13
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
14
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
15
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
16
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
17
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
18
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
19
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
20
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा

धोतऱ्याच्या बिया खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:55 IST

चोपडा तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.

ठळक मुद्दे. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती चांगली आहे.पोलीस पाटलांच्या सतर्कतेने वाचले मुलांचे प्राण

चोपडा : तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.चोपडा तालुक्यातील वढोदा येथे माणिक उखा पाटील यांच्या शेतात आदिवासी पावरा समाजातील ५ मुले खेळत असतांना त्यांनी धोतरा या विषारी वनस्पतीच्या बिया चुकून खाल्याने त्यांना विषबाधा होऊन उलट्या होवू लागल्या. ही वार्ता गावातील पोलीस पाटील संदीप रघुनाथ पाटील यांना कळली. त्यांनी तातडीने सदर मुलाना घेवुन त्यांचे मित्र माणिक पाटील, सोपान पाटील, मधुकर पाटील यांच्या मोटारसायकलवरून जवळच असलेले होळनांथे येथे दवाखान्यात घेवून गेले . तेथील डॉक्टरांनी बालकांची स्थिती पाहून त्यांना शिरपुर येथे हलवण्यास सांगितले. पोलीस पाटील व त्यांचे मित्र यांनी लगेच या मुलांना शिरपुर येथील रुग्णालयात हलवले. शिरपुर येथे त्यांच्यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. तथापि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शिरपुर येथील डॉक्टरानी त्यांना धुळे येथे हलवण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस पाटील यांनी लगेच रुग्णवाहिका मागवून त्यामधून त्यांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन आणि तेथे वेळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती ठिक असुन पुढील उपचार सुरू आहेत.दरम्यान, या विषबाधा झालेल्या मुलांचे वडिल रवाजी पावरा, नाना पावरा, भादले, पावरा यांनी पोलीस पाटील यांनी वेळीच तत्परता दाखवून त्यांच्या मुलांचे धोक्यात आलेले प्राण वाचविल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.