शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

बायको समजून वृध्दाच्या डोक्यात घातला फावड्याचा दांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:39 IST

बायको समजून शेतमालक प्रभाकर शंकर पाटील (७५) या वृध्दाच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून खून केल्याची घटना वडनगरी, ता. जळगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर हल्लेखोर शांताराम पावरा हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

ठळक मुद्देवडनगरी येथे खून  मद्याच्या नशेत केले संशयिताने कृत्य हल्लेखोर फरार

जळगाव : बायको समजून शेतमालक प्रभाकर शंकर पाटील (७५) या वृध्दाच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून खून केल्याची घटना वडनगरी, ता. जळगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर हल्लेखोर शांताराम पावरा हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वडनगरी येथे प्रभाकर शंकर पाटील यांच्या खळ्यात शांताराम पावरा ह पत्नी गिता व दोन मुलांसह राहत होता. त्यांच्याकडे तो कामालाही होता. सोमवारी शांताराम याने दारुच्या नशेत पत्नीशी वाद घातला, त्यामुळे गिता ही मुलांसह खेडी येथे राहणारा भाऊ राजू सिताराम पावरा याच्याकडे निघून गेली. त्यानंतर शांताराम याने सायंकाळी पाच वाजता प्रभाकर पाटील यांचा नातू गजानन शिवाजी पाटील यालाही दारुच्या नशेत मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दवाखान्यात आठ ते दहा टाके घालण्यात आले. गजानन याने या वादाची तक्रार पोलिसात केली नव्हती.

पत्नी व शालकाला घेतले ताब्यातया घटनेनंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, वासुदेव मराठे, संजय चौधरी, ईश्वर लोखंडे, जितेंद्र पाटील, अमीर तडवी, शैलेश चव्हाण व संदीप पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर भावाकडे गेलेली शांतारामची पत्नी गिता व तिचा भाऊ राजू या दोघांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले. शांतारामविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव