शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा

By विजय.सैतवाल | Updated: February 27, 2024 00:00 IST

काही दिवसांपासून होता तणावात

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला. 

संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा 'रुममेट' शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत  खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्र्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली व त्याला विश्वंभरने गळफास घेतल्याचे दिसले. ते दृष्य पाहताच शिवमसिंह खाली गेला व इतर विद्यार्थ्यांसह त्याने ती माहिती रेक्टरला दिली. त्यानंतर  एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले.  नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

दोन ते तीन दिवसांपासून तणावात

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्वंभर तणावात होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. सोमवारी दुपारी कार्यक्रम सुरू असताना त्याला दोन ते तीन वेळा मोबाईलवर कॉल आले. त्यावेळी तो उठून बाहेर बोलायला जात होता.

४:४१ वाजता मित्राशी शेवटचे बोलणे

कार्यक्रमाच्या ठिकाणाहून विश्वंभर निघून गेल्यानंतर शिवमसिंहने त्याला कॉल केला. दुपारी ४:४१ वाजता त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले, असे शिवमसिंहने सांगितले. दुपारी ३:३० वाजता विश्वंभर हा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेला त्यावेळी त्याला खूप घाम आलेला होता, असेही त्याने सांगितले. शिवमसिंह खोलीवर गेल्यावर दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने मनात भीती निर्माण झाली होती व दरवाजा उघडताच भयावह दृष्य दिसल्याचे शिवमसिंहने सांगितले.

‘बॅकलॉग’विषयी घरी सांगितले नाही!

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये विश्वंभर दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला होता. त्यापैकी एका विषयाची परीक्षा २२ फेब्रुवारीला झाली होती, तर २९ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या विषयाची परीक्षा होती; मात्र त्यापूर्वीच विश्वंभरने टोकाचा निर्णय घेतला. 'बॅकलॉग'विषयी त्याने घरी सांगितलेले नव्हते. परीक्षा झाल्यानंतर विषय निघाले अथवा राहिले तरी त्याविषयी घरी सांगणार असल्याचे त्याने त्याचा मित्र शिवमसिंहला सांगितले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव