शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत लातूरचे ‘विठ्ठला’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:15 IST

दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप

ठळक मुद्दे जळगाव परिमंडलाचे ‘सांबरी’ द्वितीयमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर विनोदी भाष्य

जळगाव : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत लातूर परिमंडलाने सादर केलेल्या ‘विठ्ठला’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले तर जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या ‘सांबरी’ नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समारोप झाला.महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचे छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात आयोजन करण्यात आले होते. २८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद परिमंडलाचे बब्रुवान रुद्रकंठावार लिखित ‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ हे नाटक सादर केले तर दुपारच्या सत्रात लातूर परिमंडलाने विजय तेंडूलकर लिखित ‘विठ्ठला’ हे नाटक सादर केले. त्यानंतर संध्याकाळी नाट्यस्पर्धेचा समारोप होऊन पारितोषिक वितरण करण्यात आले.पारितोषिक वितरण सोहळ््यास जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारुख शेख, चंद्रशेखर मानकर, प्रकाश पौणिकर, परिक्षक चंद्रकांत अत्रे, डॉ. हेमंत कुलकर्णी, शुभांगी पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.दीपक कुमठेकर यांनी समारोपीय भाषणात निर्भेळ आनंदासाठी जीवनात कलेला महत्त्व असल्याचे सांगून महावितरणच्या सर्व कर्मचारी कलाकारांचे कौतुक केले. यावेळी सह मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजे भोसले यांच्यासह उपस्थितांनीही मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील व संदिप पाचंगे यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी आभार मानले. योग शिक्षिका डॉ. अनिता पाटील यांच्या चमुने लयबध्द अ‍ॅक्रोयोग सादर केले. संदिप पाचंगे यांनी ‘वºहाड निघाले लंडनला’ हे एक पात्री नाटक सादर केले. मधुसुदन सामुद्रे व चमूने नृत्य व कराटे प्रात्याक्षिक सादर केले.माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर विनोदी भाष्य‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ या नाटकाने माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर विनोदी भाष्य केले. या नाटकात श्रावण कोळनूरकर, शिवाजी नरवडे, रमेश शिंदे, सुनील बनसोडे, अभय एरंडे, ज्ञानेश्वर आर्दड, किशोर तिळवे, अशोक गवई, अश्विनी पिलवाड, उल्हास देशपांडे, किशोर चौबे, गणेश शिंदे, श्रीपाद भोंडे, अनिता सातदिवे आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली.‘विठ्ठला’ने भक्तिमय वातावरण‘विठ्ठला’ने वातावरण भक्तिमय करून टाकले. या नाटकात प्रमोद कांबळे, प्रशांत जानराव, मंजुषा पाठक, अमोल काळे, गणेश कराड, कानिफनाथ सुरवसे, सचिन साळवे,महादेव गडदे, राजेश शिंदे, श्रीदेवी सौदागर, दिपक भवरे, अजय गुळवे, लक्ष्मण वारकरी, रणजित अल्हाद, कृष्णा ढोरमारे आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली.वैयक्तिक पारितोषिकेउत्कुष्ट दिग्दर्शकाचे प्रथम पारितोषिक प्रशांत जानराव (विठ्ठला) यांना तर द्वितीय पारितोषिक पराग चौधरी (सांबरी) यांना देण्यात आले. अभिनयात (पुरुष)- प्रथम प्रमोद कांबळे (विठ्ठला), द्वितीय ज्ञानेश्वर आर्दड, अभिनय (स्त्री), प्रथम मंजुषा पाठक (विठ्ठला) व द्वितीय युगंधरा ओहोळ (सांबरी), नेपथ्यासाठी प्रथम अश्विन गायकवाड (विठ्ठला) व द्वितीय संतोष वाहणे, (फेस टु फेस), प्रकाश योजना - प्रथम अमोल काळे (विठ्ठला) व द्वितीय चेतन सोनार (सांबरी), संगीत - प्रथम अमोल साळुंके व द्वितीय योगेश सरोदे (सांबरी), रंगभूषा व वेशभूषा प्रथम मधुसुदन सामुद्रे (सांबरी) व द्वितीय लक्ष्मण काकडे (चौथ्या इस्टेटीच्या बैलाला), उत्तेजनार्थ पारितोषिक दीपक कोळी (सांबरी), प्रमोद देशमुख (फेस टू फेस), रमेश शिंदे (चौथ्या इस्टेटीच्या बैलाला), प्रशांत जानराव (विठ्ठला) यांना तर बालकलाकार म्हणून गोरक्ष कोळी यांना पारितोषिक देण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव