शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

चाळीसगावातील पहिल्या फेसबूक लाईव्ह अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 14:59 IST

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांचा मंगल परियण सोहळा आदर्श ठरला आहे.

ठळक मुद्देविवाहाचा खर्च शासनाच्या सहाय्यता निधीलावंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज जाधव यांचा आदर्श

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांचा मंगल परियण सोहळा आदर्श ठरला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासह सोशल डिस्टन्सिंंग पाळत फेसबूकच्या माध्यमातून वºहाडी व मित्र परिवाराने लाईव्ह अक्षता टाकल्या. टाळेबंदीनंतर चाळीसगाव तालुक्यातील हा असा पहिलाच विवाह असून, युवराज जाधव यांचे कौतुक आहे. विवाहासाठी होणारा खर्च वाचल्याने त्यांनी २५ हजार रुपये कोरोना उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन आदर्श निर्माण केला आहे.युवराज भीमराव जाधव हे आंबेडकर नगरमध्ये राहतात. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ते अग्रेसर आहेत. भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा प्रवास असून 'पंचम' ग्रुप नावाने ते सामाजिक उपक्रमही राबवितात.लाईव्ह अक्षतायुवराज जाधव यांचा विवाह चाळीसगाव निवासी सुभाष सातदिवे यांची कन्या वैशाली यांच्याबरोबर लॉकडाऊनपूर्वीच १९ रोजी होणार होता. दोन्ही परिवारांनी सोशल डिस्टन्सिंंग पाळत ठरलेला विवाह पार पाडायचाच. याचा निर्णय घेतला.त्यानुसार शनिवारी 'विवाहास न येण्याचे आमंत्रण' असे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आले.रविवारी दुपारी १२ वाजता हा चाळीसगाव पंचक्रोशीतील लॉकडाऊन काळात फेसबूक लाईव्ह झालेला पहिला विवाह पार पडला. वºहाडी आणि मित्र परिवाराने वधू- वरांवर लाईव्ह अक्षता टाकल्या.२५ हजार रुपये सहाय्यता निधीलायुवराज व वैशाली या नवदाम्पत्याने विवाह करताना आदर्शच निर्माण केला आहे. टाळेबंदी असताना त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे गर्दी टाळून विवाह केला. विवाहासाठी होणारा खर्च वाचल्याने २५ हजार रुपये कोरोना उपाययोजनांवर करणा-या मुख्यमत्री सहाय्यता निधीस दिले. विवाह पार पडल्यानंतर नवपरिणीत जोडी तहसील कार्यालयात आली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, धर्मभूषण बागूल, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, रोशन जाधव आदी उपस्थित होते.याबरोबरच कोरोना फायटर्स पोलीस, आरोग्यदूत, पत्रकार यांना मास्क व सॅनिटायझर, सुरक्षा किटही देण्यात आले.यावेळी सर्वांनी उभायतांना सोशल डिस्टन्सिंंग राखत शुभाशीर्वाद दिले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव