शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तरुणीने परीक्षा देऊन बांधली जोडीदारासोबत आयुष्याची गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 12:27 IST

नववधूचे कौतुक

ठळक मुद्देलग्नाच्याच दिवशी परीक्षा आल्याने हळदीच्या अंगाने दिला पेपर हळदीच्या अंगाने परीक्षा

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ - लग्नाची मुहूर्त ठरला अन् परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, यात नेमके लग्नाच्याच दिवशी एका विषयाची परीक्षा आली. अशा परिस्थितीत काय करावे, या विचारात असताना शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता जळगाव येथील कांचननगरातील भाग्यश्री अनिल आस्वाल या विद्यार्थिनीने हळदीच्या अंगाने परीक्षा देऊन नंतर लागलीच शुभमंगलसाठी उभे राहत जोडीदारासोबत आयुष्याची गाठ बांधली. या सुखद प्रसंगाचे व-हाडी मंडळींनीही स्वागत करीत नववधूच्या या निर्णयाचे कौतुक केले.कांचननगरातील रहिवासी असलेली भाग्यश्री ही बी.ए.च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेते. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न करण्याचा निर्णय होऊन जळगाव तालुक्यातीलच दापोरा येथील गोपाल के-हाळकर या तरुणासोबत तिचा विवाह निश्चित झाला व विविह मुहूर्तदेखील ठरला.मुहूर्त ठरलेला असताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि त्यात नेमके २० एप्रिल या विवाह मुहूर्ताच्या दिवशी मराठी विषयाचा पेपर आला. एकीकडे परीक्षा जवळ येण्यासह विवाह तिथीदेखील जवळ येत होती. या दरम्यान विवाहासाठी असणारी लगबग सुरू असताना भाग्यश्रीने बस्ता काढण्यापासून सर्व तयारी केली. तर दुसरीकडे परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला.२० एप्रिल विवाहाचा दिवस उजाडला, दुपारी १२ वाजता विवाह मुहूर्त आणि सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत परीक्षा. अशा वेळी भाग्यश्रीने परीक्षा देण्याची तयारी दाखविली व या वेळी तिचे मामा जितेंद्र वारुळकर व इतर नातेवाईकांनीदेखील तिला परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार भाग्यश्री अंगाला हळद लागलेली असताना २० रोजी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहचली. परीक्षेला तर बसली मात्र लग्नघटिका समीप येत असताना एकीकडे नवीन आयुष्याची ओढ व आयुष्यातील परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा अशा प्रसंगात भाग्यश्रीने शांततेने परीक्षा दिली.या वेळी तिच्या सोबत प्रशांत अंबिकार, टिना अमोदकर, रोहन वारुळकर हे परीक्षा केंद्रावर आले होते. परीक्षा झाल्यानंतर भाग्यश्रीला घेऊन ते विवाहस्थळी पोहचले. तेथे वधूचा साज चढवून भाग्यश्री लग्नासाठी उभी राहिली आणि परीक्षेपाठोपाठ दापोरा ता. जळगाव येथील गोपाल के-हाळकर यांच्याशी आयुष्याची गाठ बांधली.

टॅग्स :examपरीक्षाJalgaonजळगाव