शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
3
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
4
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
5
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
6
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
7
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
8
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
9
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
10
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
11
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
12
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
13
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
14
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
15
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
16
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
17
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
18
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
19
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
20
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

शाळेचा पहिला दिवस : कुठे अश्रू... कुठे हसू... शिक्षकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:28 PM

कुतूहल अन् आईवडिलांची प्रतीक्षा

जळगाव : बँडचा गजर, शिक्षकांनी केलेले औक्षण, गुलाबाच्या फुलांनी झालेले स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके अन् हा दिवस आणखी आनंदी करायला मिळालेला गोड खाऊ़़़ अशा चैतन्यमयी वातावरणात शहरातील शाळा दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टयानंतर सोमवारी उघडल्या़ पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याची किलबिलाटासह शिक्षकांची चिमुरड्यांना रमविण्यासाठी सुरू असलेली धावपळ त्यातच बराच वेळ झाल्याने आई-वडिलांकडे जाण्यासाठी बालकांची होणारी घालमेल असे सारे वातावरण बघायला मिळाले़ नव्यानेच शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना मात्र रडू कोसळले.दरम्यान, ढोल-ताश्यांच्या गजरात होत असलेले स्वागत, ट्रॅक्टर, कार, बैलगाडीमधून काढलेली मिरवणुकीमुळे काही विद्यार्थ्यांना आपणच सेलिब्रेटी असल्याचा एक अनोखा फील देत होते.शाळेचा पहिला दिवस असल्याने सकाळपासून शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी होती. लहान मुलांचे रडणे, मध्येच पटांगणात पडणे सुरु होते. आईवडिलांना सोडून शाळेत जाण्यासाठी तयार नसलेल्या विद्यार्थ्यांना चॉकटेल व आईस्क्रिम दिले जात होते.तर काही पालकांकडून लाडाने उचलून घेत का? याचा शोध घेत बसल्याचे चित्र पहिल्या दिवशी बघायला मिळाले़जेवणाची सुट्टीनंतर सुरु झालेली शाळा पहिल्या सत्रापेक्षा थोडी चांगली वाटली. एरव्ही शांत राहणारे चिमुरडे आपल्या शेजारील मित्राची वॉटरबॅग, स्कूल बॅगकडे कौतुकाने पाहत होते. थोडा परिचय झाला, मैत्री झाल्याने सहकारी मित्रासोबत काही प्रमाणात बोलणे आणि खेळणे देखील सुरु झाले. शाळेच्या पहिल्या सत्रापेक्षा दुसरे सत्र मात्र आवडायला लागले.आई-बाबांना मारली मिठी़़़गणेश कॉलनी, एम़जे़ कॉलेज परिसर, जुने जळगाव परिसर, बी़ जे़ मार्केट परिसरातील शाळांबाहेर सकाळपासून पालकांनी प्रचंड गर्दी केली होती़ मुलांला शाळेत पाठविल्यानंतर तो रडत तर नसणार ही चिंता देखील पालकांना सतावत होती़मात्र, काही तासांनी शाळा सुटताच चक्क नवीन चेहऱ्यांनी भेदरलेल्या चिमुकल्यांनी आई-बाबांना पाहताच मिठी मारत आपल्या तुटक्या शब्दांमध्ये शाळांमधील अनुभव सांगितला़रडू नकोस नां!शाळेचा पहिला दिवस़़़उत्साह मात्र, वर्गात येताच आई-बाबांसमोर नसल्याचे पाहताच अनेक विद्यार्थ्यांनी रडणे सुरू झाले होते़ यातच रडक्या दोस्तमंडळींना डोरेमॉन- छोटा भीम दाखवून रडू नकोस ना, असं सांगण्यातही ही दोस्तमंडळी मागे नव्हती. अशा सर्वच गोष्टींमधून हे सगळं आपलंच आहे, अशी एक आगळीवेगळी भावना हे छोटे दोस्त एकमेकांशी शेअर करत असल्याचे शाळांमधून अनुभवायला मिळाले. शिक्षकही विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध क्लुप्त्या लढविताना दिसून आले़रडणे, हसणे आणि धम्माल मस्तीआई-बाबा नाही आणि वर्गात आपल्यासारखीच दुसरी बालके पाहून सुरुवातीला रडवेली झालेली चिमुरड्यांना शिक्षिकेकडून सांगण्यात येणारी गोष्ट आणि गाणी ऐकण्याशिवाय पर्याय नाही. सुरुवातीला रडणे मध्येच हसणे असे वातावरण सर्वच शाळांमध्ये दिसून आले. दरम्यान, यंदा शाळांमध्ये खेळणी, कार्टून्स तसेच विविध मंनोरंजनात्मक खेळ घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी धम्माल सुध्दा केली़