शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पित्याच्या अंत्यसंस्कारात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाकडून फायरींग; छातीत गोळी गेल्याने वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 21:31 IST

अंत्यसंस्कारात मानवंदना म्हणून नातवाने बंदुकीतून हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर बंदूक लॉक झाल्याने ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांकडे दिली. लॉक तपासत असतानाअचानक बंदुकीतून गोळी निघाली व शेजारी असलेल्या तुकाराम वना बडगुजर (६५, मुळ रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्या छातीत गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता पिंप्री, ता.धरणगाव येथे घडली.

ठळक मुद्दे जळगाव जिल्ह्यातील पिंप्री येथील घटना मृत वृध्दही पोलीस कर्मचा-याचेच वडील

जळगाव : अंत्यसंस्कारात मानवंदना म्हणून नातवाने बंदुकीतून हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर बंदूक लॉक झाल्याने ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांकडे दिली. लॉक तपासत असतानाअचानक बंदुकीतून गोळी निघाली व शेजारी असलेल्या तुकाराम वना बडगुजर (६५, मुळ रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्या छातीत गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता पिंप्री, ता.धरणगाव येथे घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले निरीक्षक विठ्ठल श्रावण मोकड यांचे वडील श्रावण बारकू मोकड (८५) यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. पिंप्री, ता.धरणगाव येथे सायंकाळी अंत्यंस्कार करीत असताना अग्निडाग देण्यापूर्वी विठ्ठल मोकड यांचा मुलगा दिपेश याने मानवंदना म्हणून स्वत:जवळील बंदुकीतून हवेत दोन वेळा फायर केला. तिस-या फायरला बंदुक लॉक झाली. त्यामुळे त्याने वडीलांकडे दिली. या बंदुकीचे पॉकेट वडीलांकडेच होते. बंदुक लॉक कशी झाली हे तपासत असतानाच अचानक त्यातून एक गोळी सुटली आणि थेट शेजारी थांबलेल्या तुकाराम बडगुजर यांच्या छातीत गेली. या घटनेत बडगुजर जागीच गतप्राण झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव