शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मोहिदेपुर येथे आग लागून सहा घरे भस्मसात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:11 IST

गावात  पाणी टंचाईचे दिवस अशातच आग लागल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

जामोद: तालुक्यातील नाथजोगी समाजाची वस्ती असलेल्या महिदपुर येथे 4 एप्रिल रोजी दुपारी एक  वाजताच्या दरम्यान भर उन्हात आग लागली. आगीमध्ये सलग असलेली सहा घरे जळून भस्मसात झाली. या कुटुंबीयांची अन्न-वस्त्र-निवारा जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

भर दुपारी अचानक आग लागल्याचे कळताच मोहिते पुरात खळबळ उडाली आगीमध्ये वर्षभराचे धान्य कपडे, चांदीचे दागिने, घरगुती सामान, खाली सिलेंडर, शेगड्या इंधन अंथरूण-पांघरूण यासह दोन मोटर सायकली जळून खाक झाले. 

प्रभाकर विष्णू सोळंके, नाजूक आप्पा शिंदे, तेजराव आप्पा शिंदे, दारा रामा सोळंके, आप्पा खकाना शिंदे आणि सुरेश दारा सोळंके या सहा जणांची सलग घरे होती. ही घरे टीन पत्र्याची व कुळाची होती. आगीमध्ये सहाही कुटुंब उध्वस्त झाले असून ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

गावकऱ्यांनी विझविली आग

गावात  पाणी टंचाई चे दिवस अशातच आग लागल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मात्र सर्वांनी संकटात सापडलेल्या कुटुंबीयांसाठी धाव घेतली आपापल्या घरातील पाण्याने भरलेले हंडे आणून सर्व पिण्याच्या पाणी वापरून ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या सुदैवाने आज कृषी फिडरला विद्युत पुरवठा सुरू असल्याने बाजूच्या शेतातील विहिरीवरून मोटर चालू करून त्यांनी पाणी आणले व आग आटोक्यात आणली. उशीराने मुक्ताईनगर येथील फायर ब्रिगेडची गाडी व रुग्णवाहिका दाखल झाली. अग्निशमन दलाने राहिलेली आग त्यांनी विझविली. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. जळगाव जामोद तालुक्यातील एकाही यंत्रणेने कुठलीही मदत पुरवली नाही.

टॅग्स :fireआग