शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुकेश गुजराथी यांच्या वारसाला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:20 IST

कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली.

पारोळा, जि.जळगाव : येथील स्व.मुकेश मोतीलाल गुजराथी हे गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून अविरतपणे गल्ली-बोळात पानटपरी, चहा हॉटेलवर जाऊन वृत्तपत्र वाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कॅन्सरसारख्या आजाराने ते ग्रस्त झाले. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली.मुलाला शिकून मोठे केले. पोटाला चिमटा देत वृत्तपत्र विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलाला एमबीए करीत त्याच्यासाठी कर्ज स्वरूपाने पैसा उपलब्ध केला. मुलाला शिकविण्याची दांडगी इच्छा मुकेश यांची होती. परिस्थिती नसताना गरिबीवर मात करीत वडिलांनी मुलाला उच्च शिक्षित केले. वर्षाचा कालावधी लोटला गेला असता. मुलगा कमावता झाला असता आणि त्यांच्या नशिबी असलेली गरीबीचे ग्रहणदेखील सुटले असते. ते नेहमी सांगत की, मुलगा कमवता झाला की हे सर्व सोडून आरामाचे जीवन जगू. पण त्य आधी नियतीने डाव साधत अर्ध्या संसारात त्यांना बाद करीत जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले.वडिलांच्या आजारपण आणि निधनाची बातमी मुलगा दीपक यास समजल्यावर तो हैद्राराबाद येथे शिक्षण घेत होता. त्याने स्वत:चा लॅपटॉप विकून हैद्राबाद येथून पारोळा गाठले.मदतप्रसंगी दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय नावरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष अभय पाटील, सचिव योगेश पाटील, सदस्य संजय पाटील, विश्वास चौधरी, रमेश जैन, राकेश शिंदे, दिलीप सोनार, अशोक ललवाणी, संजय चौधरी, निंबा मराठे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा