अखेर थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:22 AM2018-03-24T00:22:57+5:302018-03-24T00:22:57+5:30

पाचोरा पालिकेतर्फे दिवसभर वसुली मोहीम

Finally, action to break the connection of the defaulters | अखेर थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई

अखेर थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाई

Next
ठळक मुद्देवारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर पालिकेने केली कारवाई वापरत्या नळांसोबतच मोटारसायकलही केली जप्तकटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरण्याचे पालिकेचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
पाचोरा, जि.जळगाव, दि. २३ : येथील पालिकेतर्फे विविध कर वसुलीची धडक मोहीम मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात शहरातील पाच थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्याने त्यांचे नळकनेक्शन कट करण्यात आले. यानंतर थकबाकीची रक्कम पूर्ण भरल्यानंतर त्यांचे कळकनेक्शन पालिकेच्या वसुली पथकाने पूर्ववत सुरू केले. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात दोन लाख ८५ हजार रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधीक्षक संजय ढमाळ, अनिल बिजलपुरे, मंगला सोनवणे, कल्पना पवार, युवराज जगताप, विलास कुंभार यांच्या पथकाने विवेकानंद नगर भागातील शिवदास चिंधू ठाकरे यांच्याकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीकर एकूण रक्कम रुपये २४ हजार थकबाकी होती. वारंवार सांगूनही त्यांनी ती भरली नाही. परिणामी अशा पाच जणांचे नळकनेक्शन पालिकेच्या पथकाने बंद केले. तसेच त्यांच्याकडील मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-एके-८८४५) ही जप्त करण्यात आलेली आहे.
पथकाने या परिसरातून २३ मार्च रोजी दिवसभरात दोन लाख ८५ हजार रुपये रक्कम वसूल केली. त्याचप्रमाणे सदर भागातील
पालिकेचे कर्मचारी एकीकडे थकबाकीदारांकडील वसुलीसाठी नळकनेक्शन खंडित करीत करण्याची कारवाई करीत असताना दुसरीकडे थकबाकीदार थकीत रक्कम भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्रही पहायला मिळाले.





 

Web Title: Finally, action to break the connection of the defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.