शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महामार्गाच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातप्रकरणी सात दिवसात गुन्हे दाखल करा; अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:16 IST

एस.पींची भेट घेऊन जिल्हा पेठला दिली तक्रार

जळगाव : राष्टÑीय महामार्गावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षात हजारो लोकांचा या रस्त्यांनी बळी घेतला आहे. या साºया घटनांना ‘नही’चे संचालक, रस्त्याचे प्रोजेक्ट इंचार्ज व ठेकेदार जबाबदार आहेत.या सर्वांविरुध्द सात दिवसाच्या आत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांना काळे फासण्यासह ठोकून काढण्याचा इशारा शिवसेनेने गुरुवारी दिला.एरंडोल व पिंंपळकोठा या दरम्यान महामार्गावर सोमवारी ट्रक व कालीपीलीच्या अपघातात नऊ प्रवाशांचा बळी गेला व ११ जण जखमी झाले. खराब रस्ते, त्यावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण या घटनेला जबाबदार असल्याने शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालुपरे यांनी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार देवून जबाबदार यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, ही लेखी तक्रारच फिर्याद समजावी, पाच दिवसात चौकशी करावी व सात दिवसात गुन्हा दाखल करावा असा अल्टिमेटम मालपुरे यांनी पोलिसांना दिला. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी तक्रार स्विकारल्यानंतर याप्रकरणात चौकशी करुन न्याय देवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी नीलेश पाटील, राजेंद्र पाटील, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, माजी उपमहानगर प्रमुख राहूल नेतलेकर, सुनील ठाकूर, भैय्या वाघ, महेंद्र सोनवणे, बापू मेने, राहूल शिंदे, विजय चौधरी, विक्की पाटील, विनायक पाटील, ललित कोतवाल, स्वप्नील घुगे, विराज कावडिया, अमित जगताप व भाजपचे अशोक लाडवंजारी उपस्थित होते.अधिकारी व कंत्राटदारात हातमिळवणी ! तीन वर्षात दोन हजारावर लोकांचा बळीतरसोद ते फागणे दरम्यानचे महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम लांबणीवर पडले आहे. नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या बाजुचे रुंदीकरण आधी करायला हवे, त्यानंतर मुख्य रस्ता दुरुस्ती किंवा नवीन काम सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र यात नहीचे अधिकारी व कंत्राटदार यांनी हातमिळवणी करुन मुख्य रस्ता हेतुपुरस्सरपणे खोदून ठेवला आहे, त्यामुळे वाहनांचे अपघात व पादचाºयांचाही जीव जात आहे. या तीन वर्षात दोन हजाराच्यावर लोकांचा या मार्गावर जीव गेला आहे. सोमवारी एरंडोलजवळ झालेला अपघात व त्यात ९ जणांचे गेलेले बळी याला हीच यंत्रणा जबाबदार आहे.याआधीही पारोळा व बांभोरीजवळ अपघात झाले व त्यात अनेकांचे बळी गेले आहेत.जनतेसाठी अंगावर गुन्हे घेऊगजानन मालपुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, महामार्गावर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यात सरकारी अधिकारी व कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आता अंत पाहिला जात आहे. सात दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल, त्यात अधिकारी व कंत्राटदारांना काळे फासू, कार्यालयात जावून ठोकून काढले जाईल. जनतेसाठी अंगावर गुन्हे घेण्याची तयारी आहे. पोलिसांना गुन्हे दाखल करायला भाग पाडले जाईल, असे मालपुरे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, नहीच्या अधिकाºयांसोबत बैठकगुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जमण्याचे आवाहन केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गजानन मालपुरे यांना चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी रजेवर गेले असून ते आल्यानंतर ३० किंवा ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, नहीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन डॉ.उगले यांनी दिल्यानंतर आज गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज दिला असे मालपुरे यांनी सांगितले.गजानन मालपुरे व सहकाºयांची पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे आज गुन्हा दाखल न करता तक्रारी अर्ज घेतला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.- अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठनहीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. पोलीस अधीक्षकांशीही चर्चा झाली. सात दिवसानंतर न्यायालयात जाण्यासह आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.- गजानन मालपुरे, माजी महानगर प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव