शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

डीजे लावणाºयांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:38 IST

अमळनेर : पर्यावरण कायद्यानुसार कारवाईची विशेष पोलीस महानिरीक्षकांची सूचना

ठळक मुद्देगणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाºयांवर कारवाई करणारजिल्हा आढावा बैठकीत सुचनासराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाºयांवर पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ प्रमाणे गुन्हे दाखल करा, कायदा व सुव्यवस्थेसाठी समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुरेश मेकला यांनी दिले.अमळनेर पोलीस स्टेशनला २४ रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत ही सूचना त्यांनी दिली.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुरेश मेकला धुळे येथे गणेशोत्सव व ईद या सणांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक अमळनेर येथे घेत सूचना दिल्या.बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी रफीक शेख, चोपड्याचे डीवायएसपी सदाशीव वाघमारे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, चोपड्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपस्थित होते.डॉ.मेकला यांनी जिल्ह्याच्या नकाशांची पाहणी करून चेकनाक्यांची माहिती घेतली. मिरवणूक व गणेश मंडळाजवळ सर्वत्र पथदिवे लावून सीसीटीव्हींची नजर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावा, साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचनाही दिल्या. एक तास बैठक सुरू होती.जळगाव जिल्ह्यात २५०० गणेश मंडळे असून प्रत्येक गणेश मंडळाला नियमावलीची सीडी पुरविण्यात आली आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक देखावे करणाºया गणेश मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर व विसर्जनाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेºयाने नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्वत्र सीसीटीव्ही असून महिलांचे विशेष पथक टारगटांवर कारवाई करणार आहे. जिल्ह्यात १५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.