लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी शनिवारी रात्री परस्परविरूध्द १२ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादीक शहा हाफीज उल्लू शहा (वय ४९, रा. शाह वाडा नशिराबाद ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून ७ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावातील निमजाय मंदीराजवळ सादीक शहा यांना गावातील नबिशहा लल्ला शहा, हमीद शहा, मेहबुब शहा नबी शहा, अलताफ नाशीर शहा, महंमद हुसेन नबी शहा (रा. मोमीन शहा मोहल्ला) यांनी बेकायदेशी मंडळी जमवून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटातील नबी शहा लाल शहा (वय ५५, रा. मोमीन मोहल्ला नशिराबाद ता.जळगाव )यांच्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडण्याच्या कारणावरून सादिक शहा हाफीज शहा, अक्रम शहा खलील शहा, मुक्तारशहा खलील शहा, लल्ला शहर रेहमान शहा, अख्तर शहा रहेमान शहा, वसीम शहा रेहमान शहा, इल्ला शहा अमन शहा, शोएब शहा खलील शहा (सर्व रा.मोमीन मोहल्ला) यांनी लाठ्या काठ्या घेवून नबी शहा यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप टाकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.