पंधरा लाखाची लूट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:27+5:302021-03-05T04:17:27+5:30

दुचाकीवरुन आलेल्या या दोघांनी महेश मोहनचंद्र भावसार (५३, रा.दिक्षितवाडी) व संजय सुधाकर विभांडीक (५१, रा.महाबळ) या दोघांना पिस्तूलने फायर ...

Fifteen lakh looters were caught red-handed | पंधरा लाखाची लूट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याच

पंधरा लाखाची लूट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याच

Next

दुचाकीवरुन आलेल्या या दोघांनी महेश मोहनचंद्र भावसार (५३, रा.दिक्षितवाडी) व संजय सुधाकर विभांडीक (५१, रा.महाबळ) या दोघांना पिस्तूलने फायर करण्याचा प्रयत्न करुन १५ लाखाची रोकड लुटल्याची थरारक घटना सोमवारी १ मार्च रोजी भरदिवसा सायंकाळी ५.२० वाजता पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दुचाकीच्या चेसीस क्रमांकावरुन दुचाकी मालकाचा शोध घेतला. गवळी यांनी धुळ्यात काम केलेले असल्याने तातडीने सूत्रे हलवून दुचाकी वापरणारे मनोज व विक्की यांना निष्पन्न केले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर साळवे व इम्रान सय्यद तर स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्नील नाईक, संजय हिवरकर, राजू मेढे, रवी नरवाडे यांचे पथक त्याच रात्रीच अमळनेर व धुळ्यात रवाना झाले. पोलीस पोहचण्याच्या आत दोघं जण सुरतला रवाना झाल्याचे उघड झाल्यानंतर पथक त्यांच्या मागावर गेले.

मित्राकडे उल्हासनगरला घेतली धाव

मनोज व विक्की यांनी सुरतमध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर बुधवारी सुरत येथून बसने उल्हासनगरचा रस्ता धरला. बसनेच त्यांनी प्रवास केला. दोघही सुरतमधून निसटल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथक त्यांच्या मागे गेले. उल्हासनगरात दीपक सोनार याच्याकडे पोहचून रात्रभर मुक्काम केला. बाहेर पडण्याच्या आतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली. घरझडतीत साडे नऊ लाख रुपये त्यांच्याकडे मिळून आले. बाकीच्या रकमेचा शोध घेतला जात आहे.

स्वत: हवाल्याने ३० हजार पाठविले अन‌् तेथेच शोधले सावज

मनोज मोकळ याने १ मार्च रोजी धुळ्याहून ३० हजार रुपये हवाल्याने जळगावात पाठविले. ही रक्कम घेण्याच्या बहाण्याने मनोज व विक्की दोघे जण हवाल्याच्या कार्यालयात आले. तेथे पैसे घ्यायला येणाऱ्या लोकांवर त्यांनी नजर ठेवली. महेश भावसार व संजय विभांडीक यांनी जास्त रक्कम घेतल्याचे दिसताच या दोघांचा पाठलाग करुन लूट केली.

Web Title: Fifteen lakh looters were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.