शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा 'फिव्हर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 13:08 IST

सागर दुबेसध्या महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा फिव्हर असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील कट्टे ओस पडलेले आहे़त. सगळे कट्टे सामसूम तर आहेच पण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपलाही काही वेळ विश्रांती दिल्याचे दिसून येत आहे़ मात्र, दुसरीकडे बॅग व मोबाईल चोरट्याच्या उच्छादामुळे परीक्षार्थी हैराण झाले असून यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ गेल्या ...

सागर दुबेसध्या महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा फिव्हर असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील कट्टे ओस पडलेले आहे़त. सगळे कट्टे सामसूम तर आहेच पण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपलाही काही वेळ विश्रांती दिल्याचे दिसून येत आहे़ मात्र, दुसरीकडे बॅग व मोबाईल चोरट्याच्या उच्छादामुळे परीक्षार्थी हैराण झाले असून यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परीक्षेदरम्यान मोबाईल व बॅग चोरीच्या प्रमाण वाढलेले आहे़ यंदाही तसेच प्रकार घडताना दिसून असून या घटनांना आळा कधी बसेल? हा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे़पदवी-पदव्युत्तर परीक्षांना सुरूवात झाली असल्यामुळे कट्ट्यावर मौज-मस्ती करणारी, रात्री उशिरापर्यंत फेसबुक, व्हॉटस अ‍ॅपवरून चॅटिंग करणारी तरुणाई आता रात्री उशिरापर्यंत अभ्यासात मग्न झाली आहे़ भर उन्हाळ्यात परीक्षा सुरू असून काही महाविद्यालयांच्या ढिसाळ कारभारामुळे परीक्षा वर्गातील उकाड्यामुळे परिक्षार्र्थींच्या घामांच्या धारा निघत आहे़ असे असताना देखील विद्यार्थ्यांना पेपर लिहावा लागत आहे़ महाविद्यालयांकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने तेवढा तरी दिलासा विद्यार्थ्यांना मिळत आहे़साधारणपणे जुलै-आॅगस्टमध्ये महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. सेमिस्टर पॅटर्न असल्याने वर्ष सुरू झाले की लागलीच दोनच महिन्यांत विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरच्या तयारीला सामोरे जावे लागते. मात्र दिवाळीनंतर सुरू होणारे दुसरे किंवा काही जणांचे अखेरचे सेमिस्टर हे खूप महत्त्वपूर्ण असते. कारण या परिक्षेत एक विषय जरी राहिला, तरी संपूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एरव्ही गप्पा-टप्पा आणि मौज-मस्तीत रंगणारी तरुणाई परीक्षेच्या अभ्यास करण्याला प्राधान्य देत असून, नो एक्सक्यूज म्हणत लायब्ररीमध्ये ठाण मांडून बसू लागली आहे. भर उन्हात येणे शक्य नसल्यामुळे परीक्षार्थी सकाळीच महाविद्यालयात येऊन अभ्यासला बसत आहे़ दरम्यान, विद्यापीठाच्या भरारी पथकाची सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर नजर असून हे पथक परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देत आहे़ एवढेच नव्हे तर दिवसाला पाच ते सहा कॉपी बहाद्दरांवर कारवाई होत आहे़ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही प्राजेक्ट अभ्यास आटोपले असून प्रॅक्टीकल सुरू आहेत़ अभियांत्रिकीच्या परीक्षा उशिरा सुरू होता़त त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच नोटस् काढायला सुरूवात केली आहे तर कुणी प्राध्यापकांकडून सल्ले घेत आहेत़ मात्र, परीक्षा संपल्यानंतर लागलीच दोन ते तीन दिवसांनी सीईटी परीक्षा असल्यामुळे नेमका अभ्यास कशाचा करावा, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे़ परीक्षा संपल्यावर एक दिवसात अभ्यास होणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना आहे़

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव