शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुरांतो एक्सप्रेसमध्ये मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:05 IST

जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ

ठळक मुद्देरात्री ११.५० पर्यंत दुरान्तो खोळंबलीनियंत्रण कक्षाने घेतली नाही दखल

जळगाव : मुंबईहून निघालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-इलाहाबाद दुरांतो एक्सप्रेसमध्ये दिनेश बालमुकूंद शुक्ला (वय ५२, रा.डोंबिवली, जि.ठाणे, मुळ रा.इलाहाबाद) या प्रवाशाला सोमवारी रात्री १०.१५ वाजता चाळीसगावनजीक ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे छातीत प्रचंड वेदना होत असल्याने मुलाने सहप्रवाशांच्या मदतीने तातडीच्या उपचारासाठी रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी न थांबल्याने शुक्ला यांनी प्राण सोडले व त्यानंतर एक तासाने गाडी जळगाव स्थानकावर थांबविण्यात आली.दरम्यान, डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू झाल्याने १३ वर्षाच्या मयताच्या पियुश नामक मुलाचा प्रचंड आक्रोश होत होता. त्याची ही स्थिती पाहता अन्य प्रवाशांनाही गहिवरुन आले.शुक्ला यांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करुन प्रवाशांनी जळगाव स्थानकावर ५० मिनिटे गाडी रोखून धरत तिकिट निरीक्षक व स्टेशन मास्तरला जाब विचारला. यावेळी स्टेशनवर प्रचंड गोंधळ झाला होता.जबाबदारी स्विकारल्यानंतर गाडी रवानाजळगाव स्थानकावर गाडी आल्यानंतर बराच वेळ शववाहिका आलीच नाही. अर्धा तासाने लोहमार्ग पोलिसांनी शववाहिका उपलब्ध केली. त्यानंतर शुक्ला यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शुक्ला व त्यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात लोहमार्ग पोलिसांसोबत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रवाशांनी गाडी रवाना करण्यास परवानगी दिली. लोहमार्गचे हेडकॉन्स्टेबल मधुकर पारधी व गौतम शेंड्ये यांच्याशी मुलाबाबत बोलणे करुन दिल्यानंतर ११.५७ वाजता गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, या घटनेमुळे गाडीतील प्रवाशी व रेल्वे तिकिट निरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला. तिकिट निरीक्षक एन.के.तिवारी व ए.स.मीना यांच्यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.आईपाठोपाठ वडीलांनाही मुकला मुलगादीनेश शुक्ला यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलाने प्रचंड आक्रोश केला. प्रवाशांनी त्याला धीर देत आईशी संपर्क करण्यासाठी माहिती विचारली असता गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये आईचेही निधन झाल्याची माहिती मुलाने दिली. ही माहिती ऐकून प्रवाशांना धक्का बसला. दरम्यान, शुक्ला हे डोंबिवलीत रिक्षा चालक होते. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. इलाहाबाद येथे जातीचा दाखला घेण्यासाठी शुक्ला रेल्वेने जात होते.नियंत्रण कक्षाने घेतली नाही दखलशुक्ला यांना चाळीसगावच्याजवळ छातीत त्रास व्हायला लागला. ही परिस्थिती पाहता त्यांना तत्काळ उपचार मिळावे म्हणून प्रवाशांनी तिकिट निरीक्षकांना सांगितले. त्यांनी भुसावळ नियंत्रण कक्षाला सूचना दिली, मात्र तरी देखील गाडी थांबविण्यात आली नाही. पाचोरा किंवा चाळीसगावला गाडी थांबली असती तर शुक्ला यांचा जीव वाचला असता.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव