बोदवड, जि.जळगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यात तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचे ३९ सरपंच सहभागी झाले.सकाळी दहापासून पंचायत समिती कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात आले. त्यात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्र्थींसाठी तीन वर्षांपूर्वी पंचायत समितीला ठराव देण्यात आले आहेत. परंतु सदर ठरावाबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असा सरपंच संघटनेचा आरोप आहे.पंतप्रधान आवास योजनेतील ब वर्गातील घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आता ड वर्गाच्या घरकुलांना मंजुरी द्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आल.आंदोलनात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश संतोष पाटील, महिला सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा विनोद कोळी, उपाध्यक्ष सतीश ज्ञानेश्वर पाटील, नर्मदाबाई गोविंदा ढोले, नांदगाव सरपंच पंचफुला, सोपान पाटील, विचवे सरपंच अनिता जितेंद्र तायडे यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींचे सरपंच सहभागी झाले.
बोदवड येथे घरकुलांसाठी सरपंचांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 17:52 IST
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
बोदवड येथे घरकुलांसाठी सरपंचांचे उपोषण
ठळक मुद्देतालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचे ३९ सरपंच सहभागीआंदोलन झाले पंचायत समितीसमोर