शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

शेतकऱ्यांना २५ टक्के कर्ज रोख मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक, स्टेट बॅँकेकडे ४०० कोटींची मागणी

जळगाव : जिल्हा बॅँकेकडून यंदा शेतकºयांना होणाºया पीककर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरुपात देण्याचा निर्णय जिल्हा बॅँकेने घेतला आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटांव्दारे कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी हा निर्णय घेतला होता.जिल्हा बॅँकेच्या निर्णयानंतर बुधवारी शेतकºयांना पिक कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बँक अधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, अग्रणी बँकेचे मॅनेजर अरुण प्रकाश, स्टेट बँकेचे अधिकारी महेश पाटील यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटांची हाताळणी करताना एकमेकाचा संपर्क येऊ नये म्हणून कर्ज वाटप करताना कर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात तर उर्वरित ७५ टक्के रक्कम ही कार्डद्वारे देण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्याअध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, उपाध्यक्ष किशोर पाटील आणि संचालक मंडळ यांच्यातर्फे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी स्टेट बँकेकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा बँकेला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिले आहे.जिल्ह्यातील शेतकºयांना सध्यस्थितीला पीक कर्ज वाटप सुरू आहे. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नसल्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले. शेतकºयांनी याबाबत जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षाकडे रोख रक्कमेपेक्षा किसान क्रेडीट कार्डव्दारेच पैसे मिळावे अशी मागणी केली होती. या मागणीच्या आधारावर जिल्हा बॅँकेने निर्णय घेतला.पीक क र्ज भरण्याची ३१ मे पर्यंत मुदतकर्ज घेतलेल्या शेतकºयांना आपल्या कर्जाची रक्कम भरण्याची मुदत ही दरवर्षी ३१ मे पर्यंत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर शेतकºयांना आपली रक्कम भरण्यास बाहेर येता आले नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी ही मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अनेक कर्ज घेतलेल्या शेतकºयांचा कापुस व अन्य धान्य विक्री झालेले नाही. अशा परिस्थितीत कर्ज भरता येणे कठीण आहे. जर पुढील महिन्यात कापूस खरेदी व धान्य खरेदीला सुरुवात झाली तर ३१ मे पर्यंत कर्जााची रक्कम भरता येणे शक्य होणार आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरु न झाल्यास ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव