शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल वाहतुकीसाठी लवकरच किसान रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:02 IST

व्यापार, उद्योगाला दिलासा तर कृषी क्षेत्राची निराशा, सुवर्ण व्यवसायाचाही अपेक्षाभंग

जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात फळ व भाजीपाला वाहतुकीसाठी‘किसान रेल’ सुरू करण्याची घोषणा होताच त्याचे स्वागत होत आहे. केळीचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जळगाव जिल्ह्याला या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. केळीसह व अन्य फळ भाजीपाला वाहतूक सुलभ होणार आहे. भुसावळ स्थानकावरून ही रेल्वे सुटणार असून आठवडाभरात तसे पत्रही मिळेल, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी दिली. दुसरीकडे व्यापार, उद्योग क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे तर कृषी क्षेत्राची तसेच जळगावातील मुख्य व्यवसाय असलेल्या सुवर्ण व्यवसायाची अर्थसंकल्पाकडून निराशा झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच त्या बाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात केळी पाठविली जाते. या वाहतुकीत केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्याही तक्रारी होत्या. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात फळ, भाजीपाला, शेतीमाल वाहतुकीसाठी ‘किसान रेल’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.या रेल्वेमुळे जिल्ह्यातील केळी वाहतुकीला मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास राजकीय मंडळींसह शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.माफक दरात वाहतूकज्या ठिकाणी शेतीमालाचे जास्त उत्पादन आहे, त्या भागात या रेल्वेला थांबा राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. किसान रेल माफक दरातही उपलब्ध राहणार असून आठवडाभरात या रेल्वे विषयी पत्र प्राप्त होईल, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.छोट्या निर्यातदारांना दिलासाउद्योग क्षेत्राचा विचार केला तर छोट्या निर्यातदार उद्योगांना अर्थसंकल्पामुळे दिलासा मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. घोषित करण्यात आलेल्या नवीन प्रणालीमुळे प्रक्रियेचा वेळ वाचून निर्यातदारांना परतावाही लवकर मिळू शकेल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.या सोबतच ‘टॅक्स आॅडीट’ची मर्यादा दीड कोटीवरून ५ कोटीप़र्यंत वाढविल्याने त्याचा लाभ व्यापाºयांसह सर्वांना होणार असल्याने त्यामुळे ही दिलासादायक बाब असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.कृषी क्षेत्राची निराशाअर्थसंकल्पात शेतकºयांचे खरे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी खरा उत्पादन खर्च व नफा मिळून किमान आधारभूत किंमत ठरवावी व भाव न मिळाल्यास भावांतर योजना राबवण्याची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने शेतकºयांची निराशा झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.सुवर्णनगरीची निराशाअर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क व जीएसटी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने सुवर्ण व्यवसायाची निराशा झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.शेतकºयांचे उत्पन्न वाढविसाठी मदतशेतकºयांचे उत्पन्न वाढावे यासाठी १६ कलमी कार्यक्रम सरकारने हाती घेण्याचे ठरविले ही चांगली बाब आहे. कृषी व कृषी पूरक योजनांसाठी १ लाख ५१ हजार ५१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सौर कृषी पंप योजनेवर भर देण्यासाठी भारतभरातून सुमारे २० लाख सौर कृषि पंप बसविण्याचे उद्दिष्ट शेती सिंचनासाठी आशादायी चित्र ठरू शकेल. करार शेती, शाश्वत पीक पद्धती, सेंद्र्रीय शेती, शेतीपूरक उद्योग या केंद्र्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्याºया राज्य सरकारांना प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाईल. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सकारात्मक आणि फायद्याचे होईल. कृषी उडान योजनेतून आदिवासी भागातील शेती उन्नत करणे, अशा प्रकारे चौफेर विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आशादायी म्हणता येईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. जैन इरिगेशन काम करीत असलेल्या वेगवेगळ््या क्षेत्रात भरघोस काम करण्याची संधी या अर्थसंकल्पाने उपलब्ध करून दिलेली आहे.- अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सि.लि.समाधानकार अर्थसंकल्पसमाधानकारण अर्थसंकल्प असून घोषित करण्यात आलेल्या निर्यात धोरणामुळे छोट्या निर्यातदारांना मोठा फायदा होईल. आयकर मर्यादेच्या नवीन घोषणेने भरणा करण्याची संख्या वाढू शकेल.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.व्यापा-यांकडून स्वागतअर्थसंकल्प चांगला असून सामान्यांना दिलासा देणारा आहे. पाच कोटी पर्यंतच्या उलाढालीपर्यंत टॅक्स आॅडीटची मर्यादा वाढविल्याने व्यापाºयांच्यादृष्टीने चांगाल निर्णय आहे.- विजय काबरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ. 

टॅग्स :Jalgaonजळगाव