पहूर, ता.जामनेर : खर्चाना, ता.जामनेर येथील शेतकरी मुरलीधर नामदेव पाटील (५७) यांनी कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.मुरलीधर पाटील यांच्यावर युनियन बँकेसह एका पतसंस्थेचे पंधरा ते वीस लाखाचे कर्ज होते, अशी माहिती पोलीस पाटील सुरेश मधुकर पाटील यांनी दिली. त्यांच्या नावावर अकरा एकर कोरडवाहू जमीन आहे. कर्जामुळे त्यांना निराशा आली होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.याप्रकरणी पोलीस पाटील सुरेश मधुकर पाटील यांनी पहूर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून खर्चाना गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांचे भाऊ होत. तपास साहाय्यक फौजदार अनिल अहिरे करीत आहे.
खर्चाना येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 18:20 IST