शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

तापमानवाढीमुळे केळी बागा संकटात, संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 7:22 PM

चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगाव आणि परिसरात वाढत्या तापमानामुळे हिरव्यागार केळी बागा संकटात सापडल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी शेतकºयांची प्रचंड धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देकेळी बागांभोवती साड्यांचे कुंपण बांधून बचावाचा प्रयत्नउष्णतेच्या संकटात पाणी टंचाईची भर एप्रिलमधील स्थितीमुळे मे हिटचा आतापासूनच धसका

आॅनलाईन लोकमतबिडगाव ता. चोपडा, दि.२० : आग ओकणाºया सूर्यामुळे तापमानाने कहर केला असून चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगावसह परिसरातील केळी बागांवर उष्णतेचे संकट कोसळले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी केळी बागांभोवती साड्या बांधण्यात आल्याचे दृष्य नजरेस पडत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढलेले आहे. ‘मे हीट ’ तर अजून बाकी आहे. दिवसागणिक वाढणाºया तापमानामुळे बिडगाव परिसरात केळी बागांना जबरदस्त फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपून जळू लागली आहेत. यामुळे शेतकºयांपुढे नवीनच अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्ट्यातील भागात केळी चांगली पिकत असते. तिचे भरघोस उत्पादनही घेतले जाते. चोपडा तालुक्यात सद्यस्थितीत जुनारी पिलबाग व काढणीवर आलेल्या नवती बाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. वाढत चाललेल्या तापमानामुळे शेतकºयांच्या संकटात नवीन भर पडली आहे. यात केळीच्या झाडांची पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहेत. परिणामी या केळी घडांना व्यापारी कवडीमोल भावातही घेत नाहीत. केळीबाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात होणारी केळी खरेदी, तापमानात वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. एप्रिल महिना संपायचा आहे. त्यात पुढे मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपड जोरात सुरु आहे. यात अजून भर म्हणजे खालावत चाललेली पाण्याची पातळी होय. यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला दिसतो.केळी वाचवण्यासाठी धडपडवाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी किंवा कपडा लावणे, तुरखाटी, पºहाटी यांचे झापे आडोशे म्हणून बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवे नेट लावणे, जेणेकरुन उन्हाचा तडाखा कमी प्रमाणात बसेल. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहेत. 

टॅग्स :Chopdaचोपडा