शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:06 IST

केळी उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उचंदा/मुक्ताईनगर : केळी उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी सकाळी पूर्नाड फाटा येथे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन करण्यात आले.कोरोनामुळे आधीच हातातोंडाशी आलेला केळी कवडीमोल भावात विकावी लागली आहे आणि आता त्यात भर म्हणून सीएमव्ही नावाच्या व्हायरसमुळे लागवडीखालील केळी पीक पूर्णपणे उपटून फेकावी लागत आहे. केळी उत्पादक शेतकरी हा दुहेरी आर्थिक संकटात सापडला असून त्याचे कंबरडे मोडले आहे. सरकारने फक्त पंचनामे करून केळी उत्पादकांच्या तोंडाला पाने न पुसता त्यांना भरीव अशी तत्काळ आर्थिक मदत देऊन केळी उत्पादक शेतकरी वाचवला पाहिजे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी बिल पास करून शेतकऱ्यांना कचाट्यात पकडले आहे. चार-पाच बड्या उद्योगांच्या हातात संपूर्ण शेतकºयांचा माल देऊन शेतकरी संपवण्याचा घाट हा केंद्र सरकारने घातला आहे. केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी हा संपूर्ण हवालदिल होऊन संपून जाईल.आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पंचायत समिती सदस्य किशोर पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अ‍ॅड.पवन पाटील, तालुका युवक अध्यक्ष सईदखान, उपाध्यक्ष राजेश ढोले, जिल्हा सरचिटणीस प्रवीण दामोदर,े विजय पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, प्रदीप पाटील, पवन कोळी, राहुल पाटील, मनोज पाटील, दशरत कोंडे, विशाल पाटील, साहेबराव पाटील, व्ही.एस.पाटील, संतोष पाटील, मोहन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भोला पाटील, सारंग पाटील, धीरज धनगर, संदीप धनगर, मुळाभाऊ पाटील, रवी सुरवाडे, वैभव पाटील, नितीन पाटील, साहेबराव पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, हर्षल पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.या आहेत शेतकºयांच्या मागण्याकेळी उत्पादक शेतकºयाला हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळाली पाहिजे, केळी करपा किट पूर्वरत सुरू झाले पाहिजे, केळी विमा तत्काळ मंजूर झाला पाहिजे, कापूस उत्पादक शेतकºयांंना मदत मिळाली पाहिजे, शेतकरीविरोधी कायदा रद्द झाला पाहिजे, राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन रद्द झाले पाहिजे, शेती रस्त्यांसाठी स्वतंत्र हेड निर्माण करून आर्थिक तरतूद झाली पाहिजे. 

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर