पळसोद हे गाव तापी नदीच्या काठावरच आहे, त्यामुळे शेतकरी तेथे गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच धुण्यासाठी नेत असताना मंगळवारी सुपडू चौधरी तापी नदीवर गेले होते. काठावरच कपडे व पायातील बूट काढले तसेच बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैल धूत असताना एक बैल सुपडू चौधरी यांना खोल पाण्यात घेऊन गेला. या ठिकाणावरून सुपडू चौधरी यांना परतता आले नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. पळसोद गावातील युवराज वाघ हे नदीकाठावरून जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती संपूर्ण गावभर पसरली व संपूर्ण ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. सुपडू चौधरी यांच्या पश्चात पत्नी मंजुबाई, मुलगा अनिल, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.
बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST