ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.1 - तालुक्यातील गुढे येथील दगडू फकीरा मोरे (वय 35) या शेतक:याने जमीन नापिकी व खासगी कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना 31 रोजी रोजी रात्री घडली. या शेतक:याने घराच्या छतास दोर लावून गळफास घेतला. अडीच एकर कोरडवाहू शेती असून ती वडीलांच्या नावावर आहे. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शेती वडिलांच्या नावावर असून तिघा भावांच्या नावावर प्रत्येकी तीन एक शेती आली होती मात्र नावावर करायची रहिली होती.