पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शेवगे प्र.ब. येथील गणेश भिका पाटील या ५२ वर्षीय शेतकºयाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. २ रोजी सकाळी सातला ही घटना घडली.सूत्रांनुसार, गणेश भिका पाटील हे २ रोजी पहाटे गाव विहिरीवर गुरांना पाणी पाजत होते. पाणी काढताना त्यांच्या पाय घसरल्याने ते विहिरीत पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गावातील पवन पंढरीनाथ पाटील यांनी पाहिली. तेव्हा त्यांनी गावात जाऊन सागर हिंमत पाटील, बापू सीताराम पाटील, रवींद्र सुरेश पाटील, अशोक लालचंद पाटील, शांताराम विठ्ठल पाटील यांना बोलावले व गणेश पाटील यांना विहिरीतून बाहेर काढले.पारोळा येथे कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉ.योगेश साळुंखे यांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात सागर हिंमत पाटील रा.शेवगे प्र.ब.यांनी खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील करीत आहे.
पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:03 IST
शेवगे प्र.ब. येथील गणेश भिका पाटील या ५२ वर्षीय शेतकºयाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला.
पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्देशेवगे प्र.ब. येथील घटनागुरांसाठी पाणी काढतानाची घटना