बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील मनूर बुद्रूक येथील संतोष श्यामराव पाटील या ३४ वर्षीय शेतकºयाने भर दसºयाच्या दिवशी आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. अति पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. यातून झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य आले. यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.मनूर बुद्रूक येथे संतोष पाटील या शेतकºयाने ८ रोजी दसºयाच्या दिवशी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत भगवान श्यामराव पाटील यांनी बोदवड पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.या शेतकºयाची प्रकृती खराब झाल्याने त्यास उपचारासाठी बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. त्याने काही तरी विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला असावा, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास सहायक फौजदार संजय भोसले करीत आहे.मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ दोन लहान मुले आहेत.
बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रूक येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:35 IST
मनूर बुद्रूक येथील संतोष श्यामराव पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली.
बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रूक येथे शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देअति पावसामुळे शेतात साचले पाणीनैराश्यातून संपविले स्वत:ला