शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात शेतमजूर, बांधकाम कामगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:24 IST

लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर, बांधकाम मजूर, गरजू प्लॉटधारकांचा मोर्चा काढण्यात आला.

चोपडा, जि.जळगाव : येथे लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर, बांधकाम मजूर, गरजू प्लॉटधारकांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व भारतीय शेतमजदूर युनियनचे राष्ट्रीय कमेटी सभासद अमृत महाजन, युनियनचे जिल्हा सचिव गोरख वानखेडे, खजिनदार निंबाजी बोरसे, किसानसभा हातेडचे अध्यक्ष सुनील बाविस्कर, सुनील बोहरा आदींनी केले.उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे १० शेतमजुरांची हत्या करण्यात आली. त्याचा व जम्मू-काश्मीरमध्ये जनतेचे मत विचारात न घेता ३७० व ३५ अ कलम रद्द करण्यात आले याचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर गेल्यावर नायब तहसीलदार पंजे यांना या निषेधासह शेतमजुरांच्या सविस्तर १४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतमजूर, आदिवासी बांधकाम मजुरांचे प्रश्न सोडवा आणि नवीन वीज मीटर ग्राहकांची लूट थांबवा, दुचाकीधारकांचे रेशन बंद करू नका, रेशनधान्य सुरू ठेवा, डीबीटी योजना बंद करा. शेवरे बुद्रूक आदिवासीना मारहाण करणाºया वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करा. वनाधिकार कायदा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी. वढोदा , अजंतीसीम येथील भिल्ल आदीवासीना घरकूले द्या, मोहिदा भिल्लवस्तित रस्ता ,दिवाबत्ती, गटार, सपाटीकरण ,घरकूले बांधकाम आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, बचत गटांना कर्जे द्या अंगणवाड्यांचे खाऊ शिजवणे बचत गटांकडेच सुरू ठेवा. तसेच हातेड खुर्र्द व काजीपुरा येथील गरजू बेघरांना प्लॉटचे ताबे द्या. ताबे न दिल्यास येत्या १२ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काजीपुरा सरपंच रवींद्र पवार, वासुदेव कोळी, जिजाबाई राजपूत, राजेंद्र पाटील, रतिलाल भिल, मंगल भिल, अरमान तडवी, एकनाथ वाणी, रघुनाथ बाविस्कर, दौलत वाघ, ठगूबाई कुंंभार, चमेलाबाई शिंदे, सुनील कोळी, भूषण कोळी, शिवाजी पाटील, किशोर सोनवणे, बाबूलाल वाणी, अरिफखान, प्रल्हाद मोरे, प्रेमचंद पारधी यांचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलनChopdaचोपडा