शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:01 IST

संजय हिरे / आॅनलाइन लोकमतखेडगाव, जि. जळगाव, दि. ८ - एक'आशा,.. एक 'उर्मी, ला..!.: शेतकरी पतीच्या निधनानंतर वैधव्याच्या कुºहाडीनिशी 'त्या, लढताहेत जिवनाचा लढा शेतकरी आत्महत्या..काळ्या आईच्या उजळलेल्या कुसेला मिळालेला भंयकर शाप..! मातीतून सोनं उगवणा-या भुमीपुत्राच्या संसाराची राखरांगोळी करणारा आजचा ज्वलंत विषय. निसर्गाचे दृष्टचक्र, नापिकी, कजार्चा डोंगर या भाराने भुमीपुत्र हरला ...

संजय हिरे / आॅनलाइन लोकमतखेडगाव, जि. जळगाव, दि. ८ - एक'आशा,.. एक 'उर्मी, ला..!.: शेतकरी पतीच्या निधनानंतर वैधव्याच्या कुºहाडीनिशी 'त्या, लढताहेत जिवनाचा लढा शेतकरी आत्महत्या..काळ्या आईच्या उजळलेल्या कुसेला मिळालेला भंयकर शाप..! मातीतून सोनं उगवणा-या भुमीपुत्राच्या संसाराची राखरांगोळी करणारा आजचा ज्वलंत विषय. निसर्गाचे दृष्टचक्र, नापिकी, कजार्चा डोंगर या भाराने भुमीपुत्र हरला मात्र उदरात अंकुर फुलवणाºया सृजनावर विश्वास ठेवणा-या शेतकरी मायाबहिणी अकाली कोसळलेल्या वैधव्याच्या कुºहाडीनिशी जीवनसंघर्षात हार न मानता काळ्या आईच्या आधारावर हिमंतीन लढत आहेत. पिचर्डे, ता. भडगाव येथील राखेतून संसार उभ्या करणा-या आम्ही दोघींच्या ही फिनीक्स गाथा.शिकल्या सवरलेल्या पोरीबाळींचे ज्या वयात लग्न देखील होत नाही अशा तीस-पस्तीसच्या वयात पतीने आत्महत्या केल्यान ंतर हार न मानता त्या उभ्या राहील्या.मिळून 'चौघीजंणी, ...!आशाबाई आनंदा पाटील. २०१५ मधे कजार्पायी पतीनं आत्महत्या केली. दीड एकर शेती. पोटी तीन मुली. पैकी दोन उपवर. एक शाळकरी. मुलगा नाही. चौकोनी कुटुंब पण हिंमत हरली नाही.पती निधनाच्या वेळेस दीड लाखाचे कर्ज होते. दीड एकर शेती कसली. इतर वेळेस दुस-यांच्या शेतावर कामावर जात पै-पै जमा केली. दोन मुलींचे लग्न केले. मागील वर्षी अर्धा घरहिस्सा विकला. अडीच लाखांचे खाजगी कर्ज घेतले. टुमदार घर बांधले.घेतलेले कर्ज फेडण्याची घमेंड आहे. एक मुलगी दहावी शिकतेय. पती निधनाचे शल्य आजही दु:ख देते पण मुलींसाठी जगायचं आहे. हा निर्धार. घरातील भिंतीवर पती आनंदा पाटील यांच्या फोटोसमोर आठवणींना उजाळा देत जणुकाही तुम्ही हरलात मी मात्र हार न मानता लेंकीसांठी आयुष्य कंठतेय. शेतकरी आत्महत्यामधून वैधव्याची कु-हाड कोसळणा-या शेतकरी मायाबहिंणीची उमेद जागवणारी ही 'आशा, बाई मिळुन चौघी जंणीचे जग सावरतेय.भाऊबंदांचा साथपिचर्डे येथीलच दुसरे कुंटुंब. प्रवीण उत्तम पाटील.पाच एकर वाडिलोपार्जीत शेती. कर्ज कुणावर नसते.पण थोड्याफार कजार्पायी हाय खाल्ली .तीन वषार्पुर्वी जीवन संपविले. पत्नी उर्मिला पाटील यांच्यासह एक वषार्चा मानव व चार-पाच वर्षाचा मुलगा सचिन पोरके झाले. पतीचे भाऊ मच्छींद्र पाटील,विश्वास पाटील विभक्त असलेत तरी एकत्र कुटुंब पद्धतीतील एक विचाराने कुटुंब तरले. तीन एकर शेती पुतण्या किशोर, गणेश यांच्यासमवेत कसण्यास सुरवात केली.भावाच्या मागे भाऊबंधांनी कुटुंबावर मायेची सावली धरली. पती निधनानंतर त्यांनी मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले. शेती कसणे सोपे नव्हे. मातीशी गाठ असते. अनेक जण 'ती, त मिळाले. आपल्यावर वैधत्व येउनही काळ्या आईला ‘हिरवा चुड्या’ चे भाग्याचे लेणे मिळवून देणे त्याहुनही कठीण.! इथे आशाबाई, उर्मिला बाई त्यासाठी धडपडताहेत.

टॅग्स :JalgaonजळगावWomen's Day 2018महिला दिन २०१८