मागील तीन वर्षांपासून अधिपरिचारिका अर्चना वासनिक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्षितीजा हेंडवे या वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होत्या . कोरोना कालावधीतही त्यांनी चोख सेवा बजावली आहे . डाॅ. हेंडवे यांची बदली पनवेल येथे झाली. परंतु त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती झाली हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या जागी लवकरात लवकर योग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वरणगावकरांनी केली आहे. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते, प्रास्ताविक आयसीटीसी केंद्रांच्या समुपदेशिका ज्योती गुरव यांनी केले.
क्षितिजा हेंडवे व अर्चना वासनिक यांना निरोप देतांना कर्मचारी
पिंपळगाव बुद्रुक येथे कृषीकन्येचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वरणगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऐश्वर्या गजानन सोनवणे हिने तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या गावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
प्रत्येक वनस्पतीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता असते. ही अन्नद्रव्ये वनस्पतीला वाढ आणि विकासाच्या प्रत्येक अवस्थेत खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्या पिकात असल्यास आढळून येणारी लक्षणे व त्यावरील उपाययोजना यावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी नारायण सरोदे, मंगला पाटील आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. तिला कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथील कनिष्ठ अधिष्ठाता डॉ. गाडेकर, डॉ. ए. के. कोलगे, डॉ. बी. डी. रोमाडे, डॉ. के. आर. चव्हाण आणि विशेषज्ञ डॉ. एन. जी. धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.