शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

उसनवारीच्या पैशांवरुन महिलेसह कुटुंबियांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:08 IST

गुन्हा दाखल : धनादेश न वटल्याने केली मारहाण

जळगाव : उसनवारीने दिलेले पैसे परतफेडीसाठ दिलेला दोन लाखाचा धनादेश न वटल्याने त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बिलकीस आरीफ पटेल (३५, रा.रुबी अपार्टमेंट रामनगर) यांना व कुटुंबियांना सात ते आठ जणांनी लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी भावना जवाहरलाल लोढा (३८,रा.अयोध्यानगर), सईदाबी फारुख पटवे (४०) व मुजाहीद फारुख पटवे (१८) दोघे रा. रा. शिरसोली नाका यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २० आॅगस्ट रोजी ही घटना घडली होती.बिलकीस पटले यांनी ओळखीतून ३० आॅक्टोंबर २०१९ रोजी भावना लोढा यांना ११ महिन्यांनी परत करण्याच्या बोलीवर एक लाख रुपये उसनवारीने दिले होते. याबाबत बिलकीस पटेल यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घतले होते. तसेच याबदल्यात भावना हिने एक लाख रुपयांचा धनादेशही दिला होता. १ नोव्हेंबर २०११ रोजी भावना हिने एक लाख रुपये मागितले. अशाप्रमाणे बिलकीस पटेल यांनी भावना लोढा हिस एकूण २लाख रुपये दिले. याबदल्यात भावना हिने पटेल यांना २ लाखांचा धनादेश दिला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात पैसे परत मागितले असता भावनाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर बिलकीस यांनी भावना हिने दिलेला दोन लाखांचा धनादेश बॅकेत जमा केला असता, तो वटला नाही.पैसे परत मागितले असता मारहाणबिलकीस पटेल या भावना हिच्या घरी गेले असता, लोढा यांनी अश्‍लिल शिवीगाळ करत वाद घातला. पैसे मागितल्यास मी स्वत:चा जीव देवून पोलिसात खोटी तक्रार करेन अशी धमकी दिली. यानंतर बिलकीस पटेल यांचा पैशांसाठी पाठपुरावा सुरु होतचा. यात २० आॅगस्ट रोजी भावना लोढा यांच्यासह फारुख पटवे व मुजाहीद फारुख पटवे व सात ते आठ जण बिलकीस पटेल यांच्या घरी आले. त्यांनी पटेल यांना त्यांच्या घरात घुसून बिलकीस पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यात बिलकीस पटेल यांच्या आईस दुखापत झाली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकीही संबंधितांनी अशा आशयाच्या बिलकीस पटेल यांच्या फियार्दीवरुन भावना लोढा यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव