शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:30 PM

ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे

संपूर्ण आयुष्यभर कष्ट व मेहनत करून देशाच्या प्रगतीला ज्येष्ठांनी हातभार लावला आहे. आपल्या रक्ताचे पाणी करून जीवापाड मेहनत घेतलेली आहे. म्हणून ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्याची, त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना लागणाऱ्या औषधीमध्ये सूट देण्याची गरज आहे. ज्येष्ठांना मानधन म्हणून दरमहा कमीत कमी १० हजार रूपये पेन्शनच्या स्वरूपात रक्कम द्यावी. ज्यांना स्वत:चे घर नाही, अशा ज्येष्ठांना सवलतीच्या दरात निवारा निर्माण करून दिला पाहिजे. मुलभूत गरजा म्हणून एवढ्या तरी सवलती राज्य सरकारने दिल्या पाहिजेत. हे सरकारचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये. ज्येष्ठांना सुखाने जीवन जगता यावे म्हणून राज्य वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ व इतर संघटनांनी ज्येष्ठांच्या मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चा काढून उपोषणही केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करीत आक्रोशही केला. सतत-सतत आक्रोश करून आज ज्येष्ठ नागरिक थकून गेलेला आहे. घशातून आवाज निघत नाही. लढण्यासाठी पुरेशी ताकद अंगात नाही. असे असूनसुद्धा ज्येष्ठांनी आपला लढा सुरूच ठेवलेला आहे. जवळ-जवळ १० ते १५ वर्षांपासून सतत संघर्ष सुरू आहे. ही परिस्थिती सरकार डोळ्याने पाहत आहे. परंतू निर्णय घेत नाही. ज्येष्ठांचा कुठलाही विचार करीत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सरकार एकप्रकारे ज्येष्ठांची थट्टाच करीत आहे. े.-रमेश खैरनार, कार्यालयीन अध्यक्ष, वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव