शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या डोळ्यादेखत पिता वाहिला तापीच्या पुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:39 IST

कठोरा येथील घटना : दोन दिवसापासून सुरु आहे शोध

जळगाव : तापी नदीच्या काठी म्हशी चारत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने धोका नको म्हणून तेथून उठतानाच तोल गेल्याने बाळू बलदेव सपकाळे (४८) हे पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कठोरा, ता.जळगाव येथे घडली. दरम्यान, सपकाळे यांचा दोन दिवसापासून शोध सुरु असून ते अद्यापही हाती लागलेले नाहीत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सपकाळे व मुलगा हर्षल (१७) असे दोघं जण मंगळवारी तापी नदीच्या काठावर म्हशी चारत होते.शेजारीच बकऱ्या चारणारे मुले असल्याने हर्षल त्यांच्याशी गप्पा मारत होता. तर वडील नदीकाठी बसलेले होते.हतनुर धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला.त्यामुळे धोका नको म्हणून बाळू सपकाळे तेथून उठायला लागले असता त्याचवेळी तोल गेल्याने ते पाण्यात कोसळले व क्षणातच वाहून गेले. हा प्रकार मुलाने पाहताच आरडाओरड केली.परिवाराचा प्रचंड आक्रोशसपकाळे पुरात वाहून गेल्याने परिवाराने प्रचंड आक्रोश केला. पत्नी मंगला यांची प्रकृती बिघडली आहे. सपकाळे यांच्याकडे अल्प शेती आहे. शेती व म्हशींच्या दुधावर त्यांचा उदरनिर्वाह असायचा. त्यांना दोन मुली असून एक विवाहित आहे. मुलगा हर्षल व लहान मुलीचे लग्न झालेले नाही.एक भाऊ भगवान जळगाव येथे तर विजेंद्र व बापू हे दोन भाऊ गावातच वास्तव्याला आहेत.दरम्यान, सपकाळे तापी नदी काठावरील गावाजवळ आढळून आल्यास कळवावे,अशी विनंती कठोरा येथील गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, तलाठी किरण सपकाळे यांनी बुधवारी गावात येवून माहिती घेतली.भोकरपर्यंत घेतला शोधसपकाळे पुरात वाहिल्याने गावातील लोकांनी नदीपात्रात शोध घेतला. त्यानंतर सावखेडा येथील पट्टीच्या पोहणाºयांना पाचारण करण्यात आले.रबरी ट्युबच्या सहाय्याने पोहणाºयांनी सपकाळे यांचा भादली व भोकरपर्यंत शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देवून पुढे ज्या गावातून नदीचे पात्र गेले आहे, तेथील गावकºयांना माहिती कळविली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.तापी नदीच्या वाढत्या पुरामुळे शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव