शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरण : ॲड. चव्हाणांच्या कारनाम्यांचे पुरावे न्यायालयासमोर सादर! विशेष तपास पथकाचा जामिनास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:40 IST

सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती.

जळगाव : बीएचआर प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर व उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव)  यांच्याविरुद्ध दाखल खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन अर्जावर मंगळवारी विशेष तपास पथकाने त्यांचा अभिप्राय येथील न्यायालयात सादर केला.  त्यावर न्यायालयाने दि. १० रोजी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने  (एसआयटी) सादर केलेल्या अभिप्रायात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या  पुराव्यांनिशी  गंभीर कारनाम्यांचा उलगडा केला आहे, तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या गौप्यस्फोटानंतर ॲड. चव्हाण यांनी आणखी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपास एसआयटी करत आहे.  शुक्रवारी फिर्यादी सूरज झंवर यांचा जबाब नोंदविला. मंगळवारी न्या. जे. जे. मोहिते यांच्यासमोर ॲड. चव्हाण व सोनाळकर यांच्या जामीन अर्जावर कामकाज झाले. एसआयटीने सहा पानांचा अभिप्राय सादर करून दोघांच्या जामिनाला विरोध दर्शविला आहे.

जामिनाच्या हक्कापासून दूर ठेवलेसूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तेव्हा झंवर यांनी जामिनासाठी अर्ज केला तेव्हा श्री साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. या व्यवसायात भागीदार असल्याचे ॲड. चव्हाण यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही भागीदार असल्याचाबाबत  पुरावा ॲड. चव्हाण यांनी सादर केलेला नाही. याचाच अर्थ ॲड. चव्हाण यांनी जामिनासाठी आधारहीन विरोध केला आणि अर्जदार जामिनाच्या हक्कापासून वंचित राहिले, असा अभिप्राय एसआयटीने दिला आहे.

गंभीर अभिप्राय- ६  मार्च २०२२ रोजी या गुन्ह्यातील आरोपी उदय पवार याने व्हॉटस्ॲपवर पाठवलेला संदेश व दिलेल्या मिस कॉल प्रिंटची भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब)च्या प्रमाणपत्रासह सादर.- साक्षीदार तेजस मोरे याने फिर्यादीच्या मोबाइलवर स्क्रीनशॉटद्वारे काढून पाठविलेला ॲड. मोहत माहिमतुरा (पुणे) यांच्या फोटोची प्रिंट पुराव्याकामी सादर.- फिर्यादी व साक्षीदार झंवर यांनी मोबाइल फोनद्वारे सिग्नल ॲपच्या माध्यमातून तीनही आरोपींशी केलेल्या संभाषणाविषयी पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तीनही आरोपींवर असलेल्या आरोपास पुष्टी मिळत आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस