शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रेल्वेत चढताना चप्पल अडकल्याने विस्तार अधिकाऱ्याचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:00 IST

सपकाळे कुटुंबावर कोसळले संकट

ठळक मुद्देपत्नी व मुलांचा जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोशसहका-याचा वाढदिवस केला साजरा

जळगाव : मुंबईकडून भुसावळकडे जाणाºया कामायनी एक्सप्रेसमध्ये चढताना पायºयांमध्ये अडकलेली चप्पल काढताना तोल जावून पडल्याने विजय यशवंत सपकाळे (वय ५५, रा.भुसावळ मुळ रा. किनगाव, ता.यावल) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर घडली.सपकाळे हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी म्हणून नोकरीला होते.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय सपकाळे हे भुसावळ येथून रेल्वेने ये-जा करतात. मंगळवारी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील मनिष चव्हाण यांनी त्यांना दुचाकीने रेल्वे स्टेशनवर सोडले. साडे सात वाजता कामायनी एक्सप्रेसमध्ये चढताना त्यांची एक चप्पल पायºयांमध्ये अडकली. ती काढताना रेल्वे गाडी सुरु झाली व त्यात तोल जावून ते प्लॅटफार्म व रेल्वेमधील अंतरात पडले. हा प्रकार लक्षात येताच सहप्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. कार्यालयातील सहकारी व सोबत भुसावळ येथून ये-जा करणारे शशिकांत सुरवाडे व सहकाºयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. डोक्याला मार लागल्याने वैद्यकिय अधिकारी डॉ.अर्जुन सुतार यांनी त्यांना मृत घोषीत केले.उपोषण सोडविण्यासाठी केले प्रयत्नसायगाव, ता.चाळीसगाव येथील एक कुटुंब जिल्हा परिषद सदस्याच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहे. मंगळवारी बहुतांश अधिकारी नसल्याने सपकाळे यांनीच हे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर कामकाज आटोपून ते सायंकाळी भुसावळ जाण्यासाठी निघाले.उपोषण सोडून घरी येतो...सपकाळे यांनी घरी जाण्यापूर्वी पत्नी लता यांना फोन केला होता. उपोषण सोडवायचे आहे, ते सुटले की मी लगेच घरी येतो असे त्यांनी सांगितले. सपकाळे यांचा मृतदेहच घरी नेण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली. दरम्यान, पत्नी लता, मुलगा गौरव व शुभम यांनी जिल्हा रुग्णालयात सपकाळे यांचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.सहका-याचा वाढदिवस केला साजराग्रामपंचायत विभागात सपकाळे यांच्यासोबतच कामाला असलेले वरिष्ठ लिपिक शशिकांत सुरवाडे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस कार्यालयातील सहकाºयांनी दुपारी आनंदात साजरा केला. सुरवाडे हे सपकाळे यांचे जिवलग मित्र व दोन्ही भुसावळ येथूनच रेल्वेने अपडाऊन करतात. ही घटना घडली तेव्हा सुरवाडे दुसºया बोगीत होते. डॉक्टरांनी मृत घोषीत करताच सुरवाडे यांनाही मोठा धक्का बसला. अन्य सहकाºयांनी त्यांना धीर देत सावरले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव