शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महागडी सायकल लांबविली ; एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:15 IST

जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील टी़एम़ नगर भागातून १२ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सायकल आणि हवा मारण्याचा पंप चोरून ...

जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील टी़एम़ नगर भागातून १२ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सायकल आणि हवा मारण्याचा पंप चोरून नेला होता़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथून अविनाश रामेश्वर राठोड (रा़ मेहरूण) यास अटक केली असून त्यांच्याजवळून चोरीला गेलेली महागडी सायकल हस्तगत करण्यात आली आहे.सिंधी कॉलनी भागातील टी़एम़नगरातील रहिवासी जितेंद्र श्रीचंद तलरेजा यांची महागडी सायकल व हवा मारण्याचा फूट पंप हा १२ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाउंडमधून चोरून नेले होते़ त्यानंतर १३ मे रोजी याप्रकरणी तलरेजा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता, सायकल चोरटा हा रामेश्वर कॉलनीत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार संशयित अविनाश राठोड याला अटक करण्यात आली़ त्याची चौकशी केली असता त्याने सायकल चोरी केल्याची कबूली दिली व पोलिसांना चोरलेली सायकल देखील काढून दिली आहे़ त्यासत न्यायालयात हजर केले असता सुनावणीअंती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे, सचिन चौधरी, सचिन पाटील यांनी केली आहे़ पुढील तपास पो.कॉ. हर्षवर्धन सपकाळे करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव