शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:24 IST

सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च

जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या दुसरी हिशोब तपासणी १५ रोजी करण्यात आले. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च झाला आहे. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांनी खर्च सादर केल्याने पहिल्या दोनही तपासणीमध्ये कोणालाही नोटीस काढण्याची वेळ आली नाही.जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या तसेच माघार घेतलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याविषयी जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी पत्र काढून ते उमेदवारांना ई-मेल तसेच मोबाईलवर पाठविले होते. त्यात निवडणूक खर्च हिशोब नोंदवही तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी मनपा इमारतीमध्ये असलेल्या हिशोब शाखेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ११ रोजी उमेदवारांच्या हिशोब वहीची पहिली तपासणी ११ रोजी झाली. त्यानंतर १५ रोजी दुसरी तपासणी करण्यात आली.यात उमेदवारांनी सादर केलेल्या हिशोबानुसार भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा १० लाख ५३९ रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ४ लाख ७७ हजार ३७१ रुपये, अपक्ष उमेदवार अनिल वाघ यांचा ६७ हजार ८५३ रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख ६३ हजार ५७५ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा ४७ हजार ७७७ रुपये, अपक्ष डॉ. आशीष जाधव यांचा ४० हजार ६१६ रुपये, शिवराम पाटील यांचा ३७ हजार ६४५ रुपये, अपक्ष गोकूळ चव्हाण यांचा २४ हजार ९५० रुपये, माया अहिरे यांचा २२ हजार १९१ रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा १६ हजार ९३८ रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १३ हजार २६६ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा १० हजार ७०३ रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ५ हजार ३२० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव