जळगाव : समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहरातून हद्दपार केलेल्या राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) याने त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन ही घरफोडी केली आहे. या चौघांकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभराच्या मेहनतीनंतर या चौघांना निष्पन्न केले. अटक केलेल्यांमध्ये राहूल नवल काकडे, बबुल रवींद्र सपकाळे (२६), किरण किशोर गोटे (१९) व बापु भावलाल सोनवणे (२२) सर्व रा.समता नगर, जळगाव यांचा समावेश आहे. काकडे याच्याविरुध्द हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात २५ ते २६ मार्चच्या दरम्यान समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये रोख व ७९ हजाराचे दागिने असा ऐवज लांबविला होता.अहिरे हे कुटुंबियांसह सैलानी येथे गेले होते. तेथून परतल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, रामचंद्र बोरसे, दादाभाऊ पाटील, रवींद्र पाटील, विजय पाटील, श्रावण पगारे, विकास वाघ, नरेंद्र वारुळे, प्रकाश महाजन, गफूर तडवी, किरण चौधरी, हरीष परदेशी, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विनायक पाटील, दत्तात्रय बडगुजर, चालक रवींद्र चौधरी, प्रवीण हिवराळे व दीपक पाटील यांचे पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक माहिती व खबºयांमार्फत चौघांना निष्पन्न केले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पथकाचे कौतूक केले आहे.
हद्दपार आरोपीनेच केली समता नगरातील घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:29 IST
समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहरातून हद्दपार केलेल्या राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) याने त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन ही घरफोडी केली आहे. या चौघांकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
हद्दपार आरोपीनेच केली समता नगरातील घरफोडी
ठळक मुद्दे चौघांच्या मुसक्या आवळल्या दीड लाखाचे दागिने हस्तगत