शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात निघाली पाच हजार आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दीड किलोमिटरची शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:00 IST

प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवाच्या शोभायात्रेत नेत्रदिपक चित्ररथ ठरला आकर्षण

ठळक मुद्देशोभायात्रेत नेत्रदिपक चित्ररथ ठरला आकर्षणओटा परिवार व आझाद चौकात मुस्लीम बांधवांनी केले स्वागतशंभर वर्षांच्या प्रगतीचा इतिहास सांगणाºया चित्ररथाचा समावेश

आॅनलाईन लोकमतचोपडा, दि.५ - चोपडा शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवारी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील मिसाईलच्या प्रतिकृतीसह जीवंत देखावे, शिस्तबद्ध विद्यार्थी संचलनाने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुमारे दीड किलोमिटर लांबीच्या या शोभायात्रेत पाच हजार आजी-माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रारंभी प्रताप विद्या मंदिराच्या प्रागंणात ध्वजारोहण चोपडे शिक्षण मंडळाचे चेअरमन राजा मयूर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सेक्रेटरी माधुरी मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, उर्मिला गुजराथी, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, प्रफुल्ल गुजराथी, रमेशलाल जैन, प्रवीण गोपालदास गुजराथी, प्रविणकुमार सप्तर्षी, आर.बी.गुजराथी, गिरिष मयूर, नगरसेवक जीवन चौधरी, भुपेंद्र गुजराथी, शैला मयूर उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांनी केले.त्यानंतर अश्वारूढ विद्याथीर्नी, शंभर कलशधारी नववारी साडीतील विद्याथीर्नी, प्रशालेचा संपूर्ण शंभर वर्षांच्या प्रगतीचा इतिहास सांगणारे चित्ररथ, शंभरचा आकडा तयार करणारे प्रतिकृतीतील तीन मिसाईल, तसेच चोपडे शिक्षण मंडळातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बी.एड., डी.एल.एड, इंग्लीश मेडीयम, कृषी, एन.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट गाईड या विभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत विविध आकर्षक व विविध संदेश देणारे सजीव देखावे ठेऊन चित्ररथ तयार केले होते. आदिवासी नृत्यानी देखील शोभायात्रेत शोभा आणली.शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागतप्रताप विद्या मंदिर, स्वस्तिक टॉकिज, श्रीकृष्ण मंदिर, मोतिनिवास, गुजराथी गल्ली, डॉ.हेडगेवार चौक, गोलमंदिर, बाजारपेठ, बोहरा गल्ली, आझाद चौक, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक या मार्गाने सुमारे दीड कि.मि.लांबीची शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेचे स्वागत शहरभर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन करण्यात आले. गुजराथी वाडीजवळ ओटा परिवाराने व आझाद चौकात मुस्लीम जनतेने केलेले स्वागत लक्ष्यवेधी होते. ठिकठिकाणी जोरदार फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा