मुक्ताईनगर, जि.जळगाव : डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई.स्कूलमध्ये स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेतून चित्रप्रदर्शन भरण्यिात आले.प्रदर्शनाचे उद्घाटन रावेर पंचायत समितीचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी अशोक मारोतराव खाडीलकर यांनी केले. प्राचार्य ए.एन.मासुळे यांनी दीप प्रज्वलन कीले, तर सरस्वतीपूजन उपप्राचार्य व्ही.के.वडस्कर आणि उपप्राचार्या प्रज्ञा जिने यांनी केले.या कार्यक्रमास इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा अशा वेगवेगळ्या विषयांवर तब्बल ११२ चित्रांचे उत्कृष्ट रेखांकन आणि रंगकाम केले. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. आपल्या बालचित्रकारांचे चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनीसुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पुरुषोत्तम ठोसे यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका कांचन सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
मुक्ताईनगर येथे चित्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:02 IST
स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेतून चित्रप्रदर्शन भरण्यिात आले.
मुक्ताईनगर येथे चित्रप्रदर्शन
ठळक मुद्देडॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग११२ चित्रांचे उत्कृष्ट रेखांकन आणि रंगकाम स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविला उपक्रम