जळगाव- अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून विद्यापीठ बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी पाल्या आहेत़ या शेतकरी पाल्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी दर्जी फाउंडेशनच्यावतीने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांना निवेदन देवून करण्यात आली ¯fनिवेदनात म्हटले की, बळीराजा सध्या संकटात असताना आपल्या पाल्याची शैक्षणिक फी कशी भरावी ही देखील मोठी समस्या शेतकरी कुटूंबाला भेडसावत आहे. म्हणूनच शैक्षणिक फी माफ केल्यामुळे शेकऱ्यांची पाल्य शैक्षणिक प्रवाहात टिकतील.आज संपूर्ण देशाच्या पालन पोषणाची बरीचशी जबाबदारी बळीराजाच्या खांद्यावर असताना हा बळीराजाच संकटात असेल तर प्रत्येक क्षेत्रातून मदत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी़ यावेळी निवेदन देताना दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जीख, परिषद सदस्य दिपीप पाटील, क्रिडा शिक्षक व हरीतसेना प्रमुख प्रविण पाटील, सुरेश बोरनारकर, दिनेश पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
शेतकरी पाल्यांची शैक्षणिक फी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:45 IST