शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेचा उत्साह, ७०० दुचाकी तर ४०० चारचाकी येणार रस्त्यावर

By विजय.सैतवाल | Updated: September 25, 2022 15:15 IST

घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची होणार मोठी खरेदी

जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचीही मोठी लगबग दिसून येत आहे. तसेच सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७०० दुचाकी तर ४०० चारचाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही या वेळी एसी, एलईडी, वॉशिंग मशिनला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.  

कोरोनाचे सर्व बंधने दूर झाल्याने यंदा खरेदीचा अधिच उत्साह आहे. साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केले आहे.  मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असून  घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याचा अंदात विक्रेत्यांनी वर्तविला आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. अर्थसाहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज ऑफरही असल्याने याचाही ग्राहक  मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत.  

चारचाकींना वाढली मागणी

चारचाकींच्या बाजारात मोठा उत्साह दिसून येत असून नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच किमान ४०० चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज आहे. शहरातील   एकाच शोरुमध्ये पावणे चारशे चारचाकींचे बुकिंग झाले आहे. इतर शोरुमचे मिळून एकूण एक हजार चारचाकींचे बुकिंग आहे. मात्र अनेक गाड्या उपलब्ध नसल्याने किमान ४०० गाड्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे.  

७०० दुचाकींची विक्री होणार

दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये १५० दुचाकींचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान ७०० दुचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  यामध्ये  मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.  दुचाकीमध्येही अनेक मॉडेलसाठी वेटिंग आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजला

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एसी, एलईडी, वॉशिंग मशिनला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल ओव्हन व अन्य होम अप्लायन्सेसला मागणी आहे.  या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे.  

सुवर्ण खरेदीला झळाळी

पितृपक्ष पक्ष संपताच घटस्थापनेच्या  मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकूट, छत्र, सिंहासन यांना मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.  

स्वप्नातील घर होणार साकार

घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेक जण गृहप्रवेश करणार असून अनेक जण या मुहूर्तावर बुकिंग करणार आहेत. नवरात्रोत्सवात किमान १०० ते १५० घरांची विक्री होण्याचा अंदात वर्तविला जात आहे. 

सुवर्ण खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असून  घटस्थापनेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. चांदीच्या विविध वस्तूंना मागणी वाढली आहे. - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक

बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्याने घरांचे दर नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे घरांना मागणी वाढली असून नवरात्रोत्सवात घरांची विक्री होण्यासह बुकिंग होऊ शकते. - सुनील मंत्री, बांधकाम व्यावसायिक. 

कोरोनानंतर चारचाकींना चांगलीच मागणी वाढली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. - उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक

दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे  १०० दुचाकींची  डिलिव्हरी होणे अपेक्षित असून इतर दुचाकींचे बुकिंग आहे. मात्र अनेक मॉडेलसाठी वेटिंग आहे.  - अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

टॅग्स :JalgaonजळगावNavratriनवरात्री