जळगाव : महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच मंदिरे दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली असून शहरातील विविध भागांतील मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगरंगोटी होऊन, आकर्षक विद्युत रोषणाईने शहरातील विविध मंदिरे सजली आहेत.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओंकार नगरातील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्री महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी पहाटे ४ वाजता मंदिर उघडण्यात आले. २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिरात विविध सात पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता अभिजित मुहर्तावर १०८ निरंजन्याद्वारे महाआरती झाली. सायंकाळी गोरज मुहुर्ताला ६ वाजता १०८ पुन्हा निरंजन्याद्वारे महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत श्री सत्संग भजन मंडळाकडून शिवभजनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे.शिवधाम मंदिर निमखेडीनिमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर दर्शनासाठी पहाटे ४ वाजता उघडण्यात आले. त्यानंतर अभिषेक व आरती झाली. मंदिर दर्शनासाठी दिवसभर उघडे ठेवण्यात येणार असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते महाआरती होणार असून ब्रम्हाकुमारीतर्फे शिवभजनाचा कार्यक्रम होणार आहे.पंचमुखी महादेव मंदिर मेहरुणमेहरुण येथील पंचमुखी महादेव दर्शनासाठी पहाटे पाच वाजता उघडण्यात आहे. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्याहस्ते शिवअभिषेक व आरती झाली.स्वयंभू नागेश्वर मंदिरमहाबळ कॉलनी परिसरातील नागेश्वर कॉलनीतील स्वयंभू नागेश्वर मंदिर पहाटे साडेचार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर अभिषेक व आरती झाली.
जळगावात महाशिवरात्रीचा उत्साह, शिवालयांमध्ये शिवभक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST