शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सीए शाखेचे पदग्रहण उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:24 IST

सोहळा : प्रशांत अग्रवाल यांनी स्वीकारले अध्यक्षपद जळगाव : जळगाव सीए शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात झाला. या वेळी ...

सोहळा : प्रशांत अग्रवाल यांनी स्वीकारले अध्यक्षपद

जळगाव : जळगाव सीए शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात झाला. या वेळी प्रशांत अग्रवाल यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या सोबतच  उपाध्यक्ष तसेच सचिव म्हणून सौरभ लोढा, कोषाध्यक्ष तसेच विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून विकी बिर्ला यांनीही पदभार स्वीकारला. आयसीएआय भवन येथे झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन उपस्थित होते. मावळते अध्यक्ष सागर पाटणी यांनी अग्रवाल यांच्याकडे पदभार सोपविला. या सोबतच पाटणी यांनी मागील वर्षामध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. जळगाव सीए शाखेला व जळगाव शाखेला डब्ल्यूआयआरसी लेव्हलला दुसऱ्या क्रमांकाचा बेस्ट  ब्रँच अवार्ड आणि जळगाव विद्यार्थी शाखेला राष्ट्रीय स्तरावरसुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा बेस्ट अवार्ड मिळाल्याचे त्यांनी सांगितले.  आगामी वर्षात सीए सभासद, कार्यकारीणी सदस्य, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विविध विषयांवर सेमिनार, तालुका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर असे विविध उपक्रम घेण्यासह सीए शाखेला उज्ज्वल यश मिळवून देऊ, असे नवनियुक्त अध्यक्ष अग्रवाल यांनी सांगितले. सीए उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या सोबतच कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. फेसलेस इन्कम टॅक्स असेसमेंट या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ॲड. अभय अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ममता राजानी यांनी केले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव