शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

यावल व चोपडा तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:02 IST

जुलै मध्यापर्यंत ३९ टक्के पाऊस

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे बुधवारी पुरागमन होताच यावल व चोपडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून गुुरुवारीदेखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यात ७२.८५ मि.मी. तर यावल तालुक्यात ७२.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून बुधवारी चाळीसगाव तालुक्यात सर्वात कमी ६.७१ मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्याची पावसाची सरासरी ३९.४० टक्क्यांपर्यंत पोहचली असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यामध्येही वाढ होत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून पिकेही बहरू लागली आहेत. बुधवारी जिल्हाभर सर्वत्र पाऊस होऊन आबादानी झाल्याचे चित्र आहे.चोपडा तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी पाहता चोपडा तालुक्यात सर्वाधिक ४१४.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. बुधवारीदेखील एकाच दिवसात चोपडा तालुक्यातच सर्वाधिक ७२.८५ मि.मी. पाऊस झाला. त्या खालोखाल यावल तालुक्यात ७२.३३ मि.मी. पाऊस होऊन दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ६१.५० मि.मी., बोदवड तालुक्यात ५१.३३ मि.मी., धरणगाव तालुक्यात ४५.८० मि.मी., भुसावळ - ४१.६० मि.मी., अमळनेर - ४०.३८ मि.मी., जळगाव - ३५.३३ मि.मी., एरंडोल - ३४.२५ मि.मी., रावेर - ३१.४२ मि.मी., जामनेर - ३०.१० मि.मी., पारोळा - २७.५० मि.मी., भडगाव - २० मि.मी., पाचोरा - १९.७१ मि.मी., चाळीसगाव - ६.७१ मि.मी. असा एकूण ५९१.०१ मि.मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.रात्रभर भीज पाऊसबुधवार सकाळी दमदार पाऊस झाल्यानंतर रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. हा पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. रात्रभर झालेल्या भीज पावसामुळे पिकांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत रिमझिम असणाºया पावसाने सकाळी १० वाजता पुन्हा जोर धरत सर्वत्र बरसला.हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडेहतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी धरणाचे ३६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत हे ३६ उघडे असताना त्यापैकी १२ दरवाजे दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. २४ दरवाजे पूर्ण उघडे असून धरणातून २५ हजार ७८३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव