शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

धरणगावात पोलीस कारवाईचा अतिरेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

कोरोनाचे सर्व नियम पाळूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याच्या भावना धरणगावकरांमध्ये व्यक्त होत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून ...

कोरोनाचे सर्व नियम पाळूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याच्या भावना धरणगावकरांमध्ये व्यक्त होत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस खात्याने संयुक्त कारवाई करावी व पोलिसांच्या दंडाच्या ५० टक्के रक्कम पोलीस खात्याकडे जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते. परंतु प्रशासनाकडून सरसकट कारवाई सुरू असल्यामुळे धरणगावातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अशा कारवाया संयुक्तरीत्या कराव्यात, असे आदेश असतानाही धरणगावात फक्त पोलीस प्रशासनच पावत्या फाडताना दिसत आहे.

धरणगाव शहरातील अनेकांची शेती उड्डाणपुलाच्या पलीकडे आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. परंतु, उड्डाणपुलाजवळ थांबलेले कर्मचारी रिकामटेकड्यांसोबत शेतकऱ्यांवरदेखील कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणी मद्याचे दुकान आहे. हे दुकान सर्व नियम मोडून दिवसभर सुरू असते. अगदी मद्यप्रेमींची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, तरी या हॉटेलवर कारवाई होत नाही तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एका मेडिकलवर गर्दी दिसतेय म्हणून दंड आकारण्यात आला. अशाच पद्धतीने अन्य एक हॉटेलदेखील बिनधास्त पद्धतीने दिवसभर सुरू असते.

धरणगावात मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या दंडाच्या पावत्या दिल्या जात होत्या. सर्व नियम पाळूनदेखील त्रास होत असल्यामुळे गावातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर कारवाईचा अतिरेक होत असल्यामुळे पालिकेने पावती पुस्तक देण्याचे बंद करून टाकल्याचे कळते. त्यामुळे आता चक्क जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पावत्या वापरल्या जात आहेत. याबाबत काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना विचारणा केली असता शहरी भागातील कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

जिल्हा परिषदेच्या पावत्या शहरी भागात फाडणे बेकायदेशीर आहे. खरं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कोणत्याही पद्धतीचा धाक कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर पद्धतीने शहरी भागात पावत्या फाडल्या जात आहेत, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची शक्यता आहे. त्यामुळे हे पावती पुस्तक देणारे अधिकारी आणि सीईओंची चौकशी झाली पाहिजे.

माधुरी अत्तरदे, जिल्हा परिषद सदस्य

नियम पाळणारे व्यापारी आणि नागरिकांवर कारवाईचा अतिरेक योग्य नाही. पालिका प्रशासनाला गावातील सर्व व्यापारी आणि नागरिक सहकार्य करत आहेत. त्यामुळे शिस्तप्रिय नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांवरील कारवाईला विरोध आहेच. याबाबत लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गावातील नागरिकांच्या भावना कळविल्या जातील.

-विनय भावे, शिवसेना गटनेते, धरणगाव नगरपालिका

सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी बाजारात येतात. कपाशीला पाणी भरले जात असल्यामुळे मोटारी जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेल्डिंगवाल्याकडे मोटार वाईडिंग करून लगेच शेतात जावे लागते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुपारी उशीर होतोय. अशा काळात फक्त पोलिसी कारवाईची दहशत व्हावी म्हणून कारवाईचा दंडुका उगारणे योग्य नाही. अशा कारवाईला विरोधच आहे.

-कैलास माळी, भाजप गटनेते, धरणगाव नगरपालिका

====

शहरी भागातील कारवाईत पंचायत समितीच्या नावाखाली दंड आकारणे बेकायदेशीर आहे. शहरातील कारवाईसोबत आमचा काहीही संबंध नाही?. मला तर शंका आहे की, त्या पावत्या आमच्या आहेत किंवा नाही?

- मुकुंद नन्नवरे, पंचायत समिती सदस्य

शहरात होत असलेल्या दंडात्मक कारवाई करताना चुकून शहरात पंचायत समितीच्या पावत्या दिल्या गेल्या आहेत. याबाबत दखल घेतली असून, योग्य कारवाई करू. संबंधित अधिकाऱ्याला सूचना देण्यात आल्या आहेत.

- अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, धरणगाव