शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास माजी मंत्री खडसे यांंची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:11 IST

मुक्ताईनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे.

ठळक मुद्देपक्षांतर्गत अन्यायाचा सामना करताना उद्विग्न होणारे एकनाथराव खडसे आज पक्षाच्या मातृसंस्थेच्या कार्यक्रमात हजर होते.एकनाथराव खडसे यांनी स्वयंसेवकांसोबतच रांगेत उभे राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.संघाच्या शाखेत खडसे यांची हजेरी अनेकांगांनी लक्षवेधी ठरली.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे.विजयादशमी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवसानिमित्ताने तालुका स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन, मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी सकाळी येथील नगरपंचायत पटांगणात पार पडला.सकाळी नऊच्या सुमारास स्वयंसेवकांनी शहरातून पथसंचलन केले. प्रवर्तन चौक, बस स्टँड, धनगरवाडा, तहसील कार्यालय अशा प्रमुख मार्गावर पथसंचलन झाले. पथसंचलन समारोप नगरपंचायत प्रांगणात डॉ.कपील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे सचिव राजेंद्र सिंग राजपूत उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वयंसेवकांसोबतच रांगेत उभे राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तब्बल चार वर्षांपासून राज्यात सत्ता असताना सत्तेपासून दूर आहे. पक्षांतर्गत अन्यायाचा सामना करताना अनेक वेळा उद्विग्न होणारे खडसे आज पक्षाच्या मातृसंस्थेच्या कार्यक्रमात हजर होते. हे अनेकांगांनी लक्षवेधी मानले जात आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर