शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनाच हवी एलसीबी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:20 IST

सुनील पाटीलपोलीस दलात बदलीचे गॅझेट तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीतून दहा ते अकरा कर्मचारी बदलीपात्र तर काही जण निवृत्तीला आले आहेत. त्यामुळे आपल्याला एलसीबीत नियुक्ती मिळावी यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राजकीय नेत्याकडे तसेच येथून बदलून गेलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमार्फत अनेकांनी फिल्डींग ...

सुनील पाटीलपोलीस दलात बदलीचे गॅझेट तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीतून दहा ते अकरा कर्मचारी बदलीपात्र तर काही जण निवृत्तीला आले आहेत. त्यामुळे आपल्याला एलसीबीत नियुक्ती मिळावी यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राजकीय नेत्याकडे तसेच येथून बदलून गेलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांमार्फत अनेकांनी फिल्डींग लावली आहे. जिल्हा कार्यक्षेत्र, शिवाय आर्थिक गणित यामुळे बदलीपात्र अनेक कर्मचारी एलसीबीसाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्षमता असलेले व आर्थिक लोभ नसलेले अगदी बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी आहेत. मात्र त्यांच्या एलसीबी नियुक्तीला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. तर काही जण वर्षानुवर्षापासून प्रतिक्षेत आहे. एलसीबी या शाखेत खरे तर काम करण्यास प्रचंड वाव आहे. नवीन व उत्साही कर्मचाºयांना शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु गुन्हा उघडकीस आणण्यात अगदी नगण्यच कर्मचाºयांना रस आहे. इतर कर्मचारी आर्थिक आकडेमोडीतच मग्न आहेत. शंभराच्यावर संख्या असलेल्या या शाखेतून तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी अनेक कर्मचारी संख्या कमी केली होती, ती आता ७५ च्या घरात आली आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे आजच्या घडीला शेकडो कर्मचाºयांची नावे आलेली आहेत. त्यासाठी राजकीय, शासकीय अधिकाºयांसह अनेकांनी शिफासशीही केलेल्या आहेत. त्यामुळे एलसीबीला कर्मचारी नियुक्त करताना कराळे यांचा चांगलाच कस लागणार आहे. कराळे हे स्वत: कर्मचाºयांना जवळून ओळखत नाहीत. त्यामुळे विभागातील अधिकाºयांच्या शिफारसीवरच बहुतांश गोष्टी अवलंबून आहेत. कर्मचाºयाच्या कामाची पध्दत, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात ‘रिकव्हरी’ आदी मुद्दे प्रकर्षाने विचारात घेतले जाणार आहेत. काही कर्मचाºयांच्या नियुक्तया झाल्या आहेत तर काही येणाºया काळात होणार आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव