शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील या गावाला ब्रिटिशही घाबरायचे, असं होतं कारण

By अमित महाबळ | Updated: August 15, 2022 02:07 IST

ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता.

अमित महाबळ - 

जळगाव: नांद्रा बु. गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची शौर्यभूमी. गाव छोटे होते, तरी कार्य मोठे राहिले. देशासाठी लढताना ब्रिटिशांच्या नाकात दम आणायचे काम या गावातून झाले. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नोंदवला म्हणून तुरुंगवास भोगणारे ११ जण गावातील आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा येथे ‘स्वातंत्र्य सैनिक’ भवन बांधलेले आहे.

ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता. १२ सप्टेंबर १९४२ या दिवशी पोळा सण होता. त्या दिवशी त्यांनी बैलांच्या शिंगावर झेंडे बांधून मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला. तसेच ब्रिटिश फौजदाराला दोरीने बांधून ठेवले होते. त्यांनी ब्रिटिशांना त्रासून सोडले होते. म्हणूनच जवळ कानळदा गाव असूनही नांद्रा गावातच पोलीस औट पोस्ट स्थापन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आव्हाणे गावापासून भोकर, पळसोदपर्यंतचा परिसर होता.

असा झाला आझाद चौक -स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा गावात ‘स्वातंत्र्य सैनिक भवन’बांधलेले आहे. चळवळीची सुरुवात जेथून व्हायची त्या चौकास आझाद चौक असे म्हणतात. त्याचे उद्घाटन १९ सप्टेंबर २००९ रोजी झाले. हे भवन बनविण्यासाठी शामसुंदर नवाल यांनी पुढाकार घेतला, अशी माहिती नरेश नवाल यांनी दिली.

हे आहेत स्वातंत्र्य सैनिकभाऊलाल आगीवाल, भगवानदास नवाल, बाबुलाल आगीवाल, कौतिक सोनवणे, भिकारी चौधरी, बाजीराव पाटील, शंकरलाल देपुरा, भाऊलाल देपुरा, शंकरलाल नवाल, शिवनारायण आगीवाल, लालचंद तिलकचंद समदाणी.

टॅग्स :JalgaonजळगावEnglandइंग्लंड